दिलखुश बजेट, आता सात लाख रुपयापर्यंत आय कर नाही

Editorial
Spread the love

                                 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपये होती. त्याचबरोबर निर्मला सीतारामण यांनी नव्या टॅक्स लॅबमध्ये देखील मोठा दिलासा दिला आहे. या नव्या स्लॅबनुसार आता २.५० लाख रुपयांहून ७ लाख रुपये करण्यात आलं आहे.

        सीतारामण यांच्या घोषणेनुसार, वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये नवे बदल करण्यात आले आहेत.  गेल्या आठ वर्षात स्लाब बदलले नव्हते. त्यानुसार, ०-३ लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यानंतर ३-६ लाखांपर्यंत ५ टक्के तर ६-९ लाखांपर्यंत १० टक्के, ९-१२ लाखांपर्यंत १५ टक्के त्यानंतर १२-१५ लाखांसाठी २० टक्के आणि १५ लाखांच्यावर ३० टक्के अशी नवी कर रचना असणार आहे.

         केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे अशा विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदी जाहीर केल्या. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. याशिवाय, मोदी सरकारने अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. हा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे अखेरचे बजेट होते. तयार मोठा दिलासा देऊन  मोदी सरकारने  निवडणूक सोपी केली क्ल्याचे मानले जात आहे.

          यावेळी निर्मला सीतारामन यांनी सीमाशुल्क, सेस आणि सरचार्जमध्ये बदल जाहीर केले. परदेशातून आयात होणाऱ्या खेळण्यांवरील सीमाशुल्क १३ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. याशिवाय, सायकलही स्वस्त होणार आहेत. तसेच लिथियम आयर्न बॅटरीवरील सीमाशुल्कही घटवण्यात आले आहे.

               करोना काळात कोणीही उपाशी राहू नये याची काळजी आम्ही कटाक्षानं घेतली. २८ महिने ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. आता पुढील वर्षभरही आम्ही गरजू कुटुबांना मोफत धान्य देऊ. त्यासाठी सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करेल, असं सीतारामन म्हणाल्या. देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेनं वाटचाल करत असून भारताचा विकास दर ७ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं.

          २०१४ पासून केंद्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावला आहे. त्यांना सन्मान मिळाला असल्याचं सीतारामन म्हणाल्या. देशाचं दरडोई उत्पन्नात दुपटीपेक्षा अधिक वाढ होऊन ते १.९७ लाख रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या ९ वर्षांत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या सलग पाचव्यांदा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्पात त्यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ३९.४५ लाख कोटी रुपयांचा होता. तर यंदाचा अर्थसंकल्प ४० लाख कोटी रुपयांचा आहे.

 100 Total Likes and Views

0 Comments

No Comment.