भाजप -मिंधे सरकारच्या खोटारडेपणाला ब्रेक, विधान परिषद निकालांचा कौल ही चपराक; ठाकरेंच्या शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल

News
Spread the love

मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला फक्त एक जागा मिळाली आहे. यावरुनच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-भाजप सरकारवर (Shinde-BJP Govt)हल्लाबोल केला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अग्रलेखात म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीचे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक असल्याचं सामनातून म्हटलं आहे. पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. फडणवीस-मिंधे सरकारच्या खोटारडेपणास ब्रेक लागणारे हे निकाल आहेत. आणखी बरेच धक्के भाजप आणि मिंधे गटास पचवायचे आहेत. ही तर सुरुवात असल्याचा इशारा देखील सामनातून देण्यात आला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपची मक्तेदारी राहिलेली नाही. विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक असल्याचे सामनातून म्हटलं आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राजकीय वर्चस्व आहे. तरीही भाजप पराभूत होतो. हाती सत्ता, पोलीस, पैशाचे बळ असूनही पदवीधर-शिक्षक बधले नाहीत, त्यांनी भाजपचा पचकाच केल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे, महाराष्ट्राची मन की बात आहे. पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली. भाजपचा व त्यांच्या मिंधे गटाचा सपशेल पराभव झाला. फडणवीस-मिंधे सरकारच्या खोटारडेपणास ब्रेक लागणारे हे निकाल आहेत.

 132 Total Likes and Views

0 Comments

No Comment.