भाजपने जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांना पुर्ण करण्याचा तडाखा लावला आहे. मग ते कलम ३७० हटवणं असो की भव्य राम मंदिर निर्माणाची घोषणा. उत्तर प्रदेशच्या आयोध्या या पवित्र जन्मभूमित भव्यदिव्य राम मंदिर उभं राहतं आहे. राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. यासोबतच मंदिरात बसवल्या जाणार्या श्रीरामांच्या मूर्तीचे स्वरूप कसे असेल? याचीही लोकांना उत्सुकता आहे. मूर्तीतील देवाचे बालस्वरूप कसे असावे याबाबत तज्ज्ञांकडून संशोधन सुरू आहे. दरम्यान, नेपाळच्या गंडकी नदीचा ६ करोड वर्ष जुना शालिग्रामाचा भव्य खडक आयोध्येत दाखल होतो आहे. या भव्य खडकापासूनच देवाची मूर्ती बनवली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी शालिग्राम शिला येथून अयोध्येला रवाना होणार आहेत. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र प्रसिद्ध कारागीर राम व्ही सुतार या खडकात प्रभु श्रीरामांची मूर्ती कोरणार आहेत. पवित्र खडकातून देवाची भव्य मूर्ती बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर अशीच टाकलेली नाही. त्यांनी भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महादेव आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचे पुतळे साकारले आहेत.
महाराष्ट्राचे सुपुत्र राम व्ही सुतार?
राम व्ही सुतार हे जगप्रसिद्ध कारागीर आहेत ज्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा बनवला. 98 वर्षांचे असलेले राम वानजी सुतार यांचा जन्म शिवजयंतीच्या पवित्र दिनी १९ फेब्रुवारी १९२५ साली धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात झाला. कलाक्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा त्यांना श्रीराकृष्ण जोशी यांच्याकडून मिळाली. सुतार यांनी तत्कालीन बॉम्बे (आता मुंबई) येथील जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर १९५९ मध्ये ते दिल्लीत दाखल झाले. पुढं भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात काम करू लागले. याआधी त्यांनी स्वतंत्र शिल्पकार म्हणून काम केले. त्यांनी दिल्लीतील लक्ष्मी नगरमध्ये स्टुडिओ उघडला. १९९९० पासून नोएडामध्ये स्थायिक झालेल्या सुतार यांनी २००६ मध्ये साहिबााबादमध्ये कास्टिंग फॅक्टरी सुरू केली.
सुतारांचे योगदान
महात्मा गांधींचा प्रभाव असलेल्या सुतार यांनी भारतीय ऐतिहासिक वारसा पुनर्संचयित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९५४ ते १९५८ या काळात त्यांनी अजिंठा आणि वेरुळ लेण्यांमधील अनेक जुन्या कोरीव कामांच्या जीर्णोद्धारात योगदान दिले. दगडाच्या एका खंडातून त्यांनी मध्य प्रदेशातील चंबळ स्मारक उत्कृष्टपणे कोरले. साधारण १९५९ सालची गोष्ट आहे. भाक्रा-नांगल धरण बांधणाऱ्या मजुरांचा सन्मान करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुतार यांना ५० फूट उंचीचा मजूर पुतळा तयार करण्याचे काम दिले. हा पुतळा १६ जानेवारी १९५९ मध्ये प्रस्थापित करण्यात आला. जो आजही कामगारांच्या कष्टाचे प्रातिनिधिक चित्र मानला जातो.
अधुनिक भारताचे ‘विश्वकर्मा’
सुतार यांनी भारतातील ऐतिहासिक नायकांपासून ते राजकारण्यांचे इतके पुतळे बनवण्यात योगदान दिले आहे की त्यांना आजचे विश्वकर्मा म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. विश्वकर्मा हे देवतांचे शिल्पकार मानले जातात. शिवाच्या सूचनेनुसार सुवर्ण लंका बांधण्याचं त्यांना योगदान जातं. त्याचप्रमाणे भगवान शिवापासून ते आता रामापर्यंतच्या भव्य मूर्ती घडवण्यात सुतारा यांचे योगदान ऐतिहासिक ठरले आहे.
मोहन देशमुख
394 Total Likes and Views