लावणी नाचणारी गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राभर झालंय. इथेच नव्हे तर जगभर तिचे दिवाने आहेत. दोन वर्षापूर्वी गौतमी हे नाव फारसे प्रसिद्ध नव्हते. पण तिचा हंगामा धमाका करून गेला. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावची हि पोरगी फक्त २६ वर्षाची आहे. पुण्यात येऊन तिने डिग्री घेतली. पण तिला शिक्षणात रस नव्हता. एक लावणी महोत्सवात ती चमकली. मग तिने मागे वळून पाहिले नाही. गेली ४-५ वर्षे ती नाचते आहे. अर्थात ती नाचते म्हणजे काय करते इथपासून वाद आहेत. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर जोरदार टीका होते. सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले होते. यावर गौतमी पाटील म्हणते, मला याबाबत बोलायचं नाही. समोरच्या लोकांनी माझ्यावर आरोप केला. त्यांना सांगते की माझ्या चुकीची माफी मागितली आहे. यापुढे चूक होणार नाही. आता सर्व छान सुरु आहे.
ओरडणारे ओरडतात. मात्र गौतमीचा प्रत्येक कार्यक्रम धमाल होतो. तिचे गाणे पब्लिक डोक्यावर घेते. गावच्या जत्रांमध्ये तिच्या लावणीची मोठी डिमांड आहे. नुकताच खेड तालुक्यात एका कार्यक्रमात काही तरुणांकडून कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. धुडगूस घालणाऱ्या तरूणांना गावातील महिलांनी दांडक्याने चांगलाच चोप दिला. तर अशी ही मराठी सेन्शेशन आहे गौतमी. प्रचंड महत्वाकांक्षी आहे. त्यामुळे उद्या सिनेमात दिसली तर धक्का नको.
138 Total Likes and Views