मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत.
यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एक ट्विट करत नवा वाद ओढवला आहे.
आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले की , “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण -अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा”, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी ‘आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा’ असा हॅशटॅग वापरला आहे. या ट्विटच्या माध्यमातून आव्हाड यांनी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला.
163 Total Likes and Views