बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे लग्नबंधनात अडकले आहेत. गेले अनेक महिने ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर झालं लग्नं. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. लग्नासाठी त्यांनी राजस्थानचे हॉटेल निवडले. ह्या निमित्ताने राजस्थानमधलीच हॉटेलं बॉलीवूडवाले पसंत का करतात? हा विषय चर्चेत आला आहे. असे काय आहे तिकडे स्पेशल?
तसे आहे म्हणूनच तर तिकडची पसंती आहे. खास म्हणजे स्पेशालिटी आहे, प्रायव्हसी आहे, मागाल ती वस्तू मिळते. हवी ती सेक्युरिटी उपलब्ध असते. फक्त पैसा खिशात हवा. तो आहे म्हणून सिनेमावाले तिकडे जातात. आता हेच जोडपे पहा. लग्नाचे कोणतेही फोटो बाहेर जाणार नाहीत किंवा ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी सिद्धार्थ आणि कियारानं घेतली होती. सकाळपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अखेर दिलासा मिळाला. मात्र नको ते फोटो व्हायरल झाले नाहीत. एक से एक हॉटेल आहेत ह्या भागात. सुर्यागड राजवाड्याचे विशेष म्हणजे नील नावाचा एक सुंदर जलतरण तलाव इथे आहे, जो संथ प्रकाशात तलावाचे निळे पाणी प्रकाशित करतो आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना रॉयल बाथचा फील देतो. सूर्यगढचा राजशाही डायनिंग हॉल प्राचीन कटलरी आणि फर्निचरने सजलेला आहे. पॅलेसची जीमही अनोखी आहे. त्याचे नाव आखाडा असून आधुनिक यंत्रसामग्रीसह देशी सामानही येथे उपलब्ध आहे. लेक गार्डन्स येथे राहणाऱ्यांसाठी संध्याकाळ अधिक रोमांचक बनवते. येथे लोक प्रियजनांसह सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. अर्थात ह्या सर्व श्रीमंतांच्या गोष्टी. आम आदमीने त्या ऐकायच्या, वाचायच्या, पहायच्या.
लग्नासाठी या स्टार्सनी सूर्यगढ पॅलेसच्या ८० रूम्स बुक केल्या होत्या. डेस्टिनेशन वेडिंगसाठी या पॅलेसचे भाडे १ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. एका खोलीचे भाडे दोन लाख रुपयांपर्यंत आहे. रॉयल रूमबद्दल बोलायचे झाले तर त्याचे भाडे एक कोटी रुपयांपर्यंत आहे. ५,६ आणि ७ फेब्रुवारी यांचा लग्नसोहळा रंगला. ५ फेब्रुवारी रोजी मेहंदी, ६ ला संध्याकाळी संगीत समारंभ झाले. तर ७ ला सकाळी यांचा हळदी समारंभ रंगला आणि दुपारी हे दोघं बोहल्यावर चढले. पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. या पॅलसमध्ये ८० खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १५० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील निवडक कलाकार उपस्थित होते. म्हणजे तीन दिवसाचं लग्न ह्या जोडप्याला किती किती कोटी रुपयात पडलं असेल ह्याचा हिशोब लावा.
लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा कुटुंबीयांपासून वेगळे जुहू येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहणार आहेत. ही दोघं तात्पुरती सिद्धार्थच्या बांद्रा येथे असलेल्या घरी राहतील. सध्या तो जुहू येथे नवीन घर बघत आहे. त्याला जुहूमधील एक बंगला आवडला असल्याचंही समोर आला आहे. हा बंगला ३५०० स्क्वेअर फुट असून त्याची किंमत ७० कोटी आहे. त्याला त्याच्या आताच्या घरासारखंच दुसरं घरही सी फेसिंग हवं आहे. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ जुहू येथील घराला पसंती देण्याची शक्यता आहे.
220 Total Likes and Views