काही व्यक्ती अशा असतात की , ज्यांना पुरस्कार दिल्याने त्या पुरस्काराचे वैभव वाढते, तो पुरस्कार धन्य होतो. अप्पासाहेब हे त्यातलेच एक. ज्येष्ठ निरूपणकार , आदरणीय, वंदनीय ७६ वर्षे वयाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या संदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्राच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करतात. त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा घेतलाय. वडील नानासाहेब धर्माधिकारीही एक उत्तम प्रबोधनकार होते. १९४३ पासून त्यांनी कार्याची सुरुवात केली. आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य श्री आप्पासाहेब करतात. श्रवण बैठकांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं कार्य धर्माधिकारी कुटूंब करताहेत.१४ मे १९४६ रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म झाला आणि गेल्या ३० वर्षापासून निरुपण ते करत आहेत. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या या कार्याला आता त्यांचा मुलगा सचिनदादा धर्माधिकारी पुढे नेत आहे. गेल्या आठ दशकांपासून त्यांचं कुटूंब हे समाज प्रबोधनाचं काम करत आहे.
830 Total Likes and Views