भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या महिला टी-२० लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी मेगा लिलाव झाला. या लिलावात जगभरातील ४०९ महिला क्रिकेटपटूनी आपले नशीब आजमावून पाहिले. लिलावाची सुरूवातच स्मृती मानधनाने झाली. स्मृतीचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने हात वर केला. यानंतर आरसीबीने लिलावात उडी घेत स्मृतीची बोली क्षणार्धात दोन कोटीच्या पुढे नेली. अखेर आरसीबीने स्मृतीला 3.40 कोटी रूपयाला खरेदी केले.
मुंबई इंडियन्सने स्मृती मानधनासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र आरसीबीने बाजी मारली होती. अखेर मुंबईला स्मृती नाही तर हरमनप्रीत कौर मात्र मिळाली. त्यांनी हरमनप्रीतवर १.८ कोटी रूपयांची बोली लावली.
99 Total Likes and Views