लग्नाआधीच स्वरा भास्करला दिवस गेले?

Entertainment News
Spread the love

सामान्य माणसाच्या आयुष्यात लग्न हा मोठा निर्णय असतो. बॉलीवूडच्या नट-नट्या लग्नाला कशा घेतात? त्यांच्यासाठी तो एखादा सिनेमा साईन  करण्यासारखे  असते का?  हॉलीवूडमध्ये एका दिवसात दोन दोन घटस्फोट घेणाऱ्या नट्या आहेत.  आपलं बॉलीवूड त्या मानाने थोडं सोवळं आहे. मात्र अलीकडे जे कानावर येते ते भयंकर आहे. लग्नाच्या गाठी चक्क सोशल मिडीयावर पडत आहेत.  आता ही बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचेच घ्या. स्वरा भास्कर नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती बिनधास्तपणे आंदोलन करताना दिसली आहे. शाहीनबागच्या आंदोलनात स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांची पहिल्यांदा भेट झाली होती. तिने  अलिकडेच समाजवादी पार्टीच्या ह्या  फहाद अहमदशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने लग्नाची घोषणा केली होती. स्वराचं लग्न चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. दोघांनीही १६ फेब्रुवारीला स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केलं. त्यानंतर दोघंही मार्च महिन्यात लग्न करणार आहेत. पण आता लग्नाच्या व्हायरल व्हिडीओनंतर स्वरा भास्कर लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चां होऊ लागल्या आहेत.

        स्वरा भास्करच्या कोर्ट मॅरेजनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ जर्नलिस्ट योगेन शाह यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये स्वरा लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये ती आपला  बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळेच स्वरा भास्करला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. स्वरा भास्कर लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचंही बोललं जात आहे.स्वरा भास्करच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत, ‘प्रेग्नंट आहेस का?’ असा प्रश्न केला आहे. मात्र स्वरा भास्करने यावर अद्याप कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

 257 Total Likes and Views

0 Comments

No Comment.