सेल्फीला नाही म्हटले म्हणून सोनू निगमवर हल्ला

Entertainment News
Spread the love

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यावर मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झाल्याने  मोठी खळबळ उडाली. सोशल मीडियावर त्या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता यासगळ्यात सोनू निगमचे ट्विट व्हायरल झाले आहे.

                   सोनूनं म्हटले आहे की, धक्काबुक्की झाली, बाकी काही नाही. मी आता संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आपण काय करतो, कसे वागतो, गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यायला हवी यासाठी मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. तुम्हाला जबरदस्तीनं सेल्फी हवा असतो. तो कसा काय शक्य आहे, बरं  तो फोटो दिला नाही तर तुम्ही दादागिरी पण करता असं कसं चालेल? मला सेल्फीसाठी विचारणा करण्यात आली. मी नाही म्हटल्यावर समोरच्यानं मला पकडले. ज्यानं पकडले तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील होता. त्यानंतर मला वाचविण्यासाठी माझे सहकारी हरि प्रसाद मध्ये आले. त्यानं हरि यांना देखील धक्का दिला. त्यानंतर त्यानं मलाही धक्का दिला. मला वाचविण्यासाठी रब्बानी मध्ये पडले. त्यांनाही धक्का देण्यात आला. ते गंभीर जखमी झाले आहेत.

         याप्रकरणी अधिक माहिती देताना डीसीपी हेमराज राजपूत यांनी म्हटले की, सोनूच्या तक्रारीनुसार स्वप्नील फातर्पेकरच्या विरोधात कलम ३४१, ३३७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 278 Total Likes and Views

0 Comments

No Comment.