१०वीच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Analysis
Spread the love

पूर्वी म्हातारी माणसे हार्टच्या आजाराने मरायची. अलीकडे  तसे काही राहिलेले नाही. तरुणांमध्येही हृदयविकाराने निधन होण्याचे प्रमाण वाढले आहे. हैदराबाद येथे एका व्यक्तीचे  बॅडमिंटन खेळताना अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.  हृदय विकाराचा झटका बसला आणि ते खाली कोसळले. तरुणांचे एकवेळ समजू शकते. आता  शाळकरी  मुलेही  हार्टचे पेशंट  होत आहेत.

                बीड जिल्ह्यातील  क्रिकेटपटू मोहम्मद सय्यद कादर  या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे  हृदयविकाराने  निधन झाले. मोहम्मद सय्यद कादर हा पाटोदा येथील रहिवासी असून अंडर टी-२० क्रिकेट संघात त्याची निवड झाली होती. सध्या मुंबई येथे या मॅचेस चालू  आहेत. मात्र दोन तारखेला दहावीचा पेपर असल्याने तीन-चार दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी परतला होता. परीक्षेच्या आदल्याच दिवशी सकाळी मोहम्मदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. अत्यंत हुशार आणि क्रिकेटमध्ये सर्वांचा लाडका असलेला मोहम्मदच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

 181 Total Likes and Views

0 Comments

No Comment.