काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न अनेक वेळा कॉन्ग्रेसवाल्यांनाही पडत असणार. विदेशात जाऊन तिकडे भारत सरकारला झोडपण्याची त्यांची खुमखुमी कमी व्हायचे नाव घेत नाही. राहुल नुकतेच लंडनमध्ये होते. तिथल्या केंब्रिज विद्यापीठात एमबीएच्या मुलांपुढे केलेल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “माझ्या स्वतःच्या फोनमध्ये ‘पेगासस’ होता. अनेक बड्या नेत्यांच्या फोनमध्येही ‘पेगासस’ होता. अनेक गुप्तचर अधिकार्यांनी मला फोन करून सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन सतत टॅप केले जात आहेत.” भारतात मिडिया आणि न्यायालयांवर सरकारचे नियंत्रण आहे. लोकशाहीशी छेडछाड सुरु आहे असेही ते बोलले.
विदेशात जाऊन तिकडे मोदी सरकारवर टीका करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. अनेक वेळा ते तसे बोलले आहेत. गेल्या वर्षी तर त्यांनी भारताची तुलना पाकिस्तानशी केली होती.
379 Total Likes and Views