बारावीचा पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सॲपवर

Analysis
Spread the love

 बारावी परीक्षेसंदर्भात धक्कादायक गोष्टी उजेडात येत आहेत. मुलं जीव तोडून अभ्यास  करतात आणि इकडे  कॉपीमुक्तीच्या गपा चालू असताना  पेपर फुटतात. सुरु आहे तरी काय? पेपर मुळात फुटतोच कसा? कुंपणच शेत खाते आहे का? बारावी गणिताचा पेपर सुरु होण्याआधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याची माहिती पुढे आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील  सिंदखेडराजा येथे हा प्रकार घडला आहे.  हे प्रकरण थेट सभागृहात पोहोचलं तेव्हा  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. मात्र  याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही.

         यापूर्वी इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तर पेपरात छापण्याचा प्रकार समोर आला होता.  आता गणिताच्या पेपरात हा सावळा गोंधळ चर्चेचा विषय झाला आहे. हाच मुद्दा घेऊन अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अजित पवार म्हणाले की, परीक्षेचे पेपर असे फुटत असतील तर सरकार काय झोपा काढतंय का? पुन्हा म्हणतात दादा बोलतात, दादा बोलतात… परंतु अभ्यास करणाऱ्या मुलांचं यामुळे वाट्टोळं होतं. सरकारने याप्रकरणी कारवाई करावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.

         सभागृहामध्ये शिक्षणमंत्री उपस्थित नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांच्या मुद्द्याला उत्तर दिलं. मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरु केलेलं आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर गंभीर बाब आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत योग्य ती कारवाई करु.

 468 Total Likes and Views

0 Comments

No Comment.