यु-ट्यूब बघून मुलीने स्वतःच केली स्वतःची प्रसूती

Analysis
Spread the love

पिढी बदलली आहे. मुलं-मुली एकत्र येत आहेत.  त्यातून   समाज अधिक समृद्ध होणे तर सोडा हाताबाहेर जाताने दिसतो आहे. इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडीयाने पोरं  बहकले आहेत.  कोवळ्या वयात ज्याची ज्याची उत्सुकता लागते त्या सार्या गोष्टी   आजची तरुण पिढी चव घेऊ पाहते आहे. तरुण रक्त  घरच्यांच्या ताब्यात राहू इच्छित नाहीत. वयात येण्याआधीच मुला मुलींनी   दारूपासून सेक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीची चव घेतलेली असते. त्यातून  भलतेच प्रश्नं निर्माण झाले आहेत. बलात्कार, खून, छेडछाड ….बातम्या दररोज  मीडियातून  कानावर आदळत आहेत. कुणीच हे थांबवू शकत नाही असे वातावरण  निर्माण होऊ पाहते आहेत. नागपुरातील  कालच्या एक घटनेने तर आई –बापांची झोप उडाली आहे.  शिकवणीच्या नावाखाली  जाणारी आपली पोर नक्की कुठे जाते? असा  उगाच संशय त्यांना  सतावू लागला आहे.  काळ झाले काल?

           अवघ्या १५ वर्षे वयाच्या  नववीत शिकणाऱ्या एका मुलीने  भानगडीतून दिवस  गेल्याने चक्क यू-ट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती केली. तिच्या बाळाचादेखील मृत्यू झालाय. बाळाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे. नागपूर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन कसून तपास सुरु केला आहे. वर्षभरापूर्वी  ह्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. एक-दोन महिन्यांच्या चॅटिंगनंतर एका दिवशी आरोपी तरुणाने तिला बाहेर बोलावलं आणि शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर  मुलगी गर्भवती राहिली. परवा ३ मार्च रोजी रात्री तिची प्रसूती झाली. रात्री घरी आलेल्या आईला मुलीची तब्येत खालावलेली दिसली. मुलीने आपबिती सांगितली तेव्हा तिने तिला रुग्णालयात दाखल केले.

                      सदरील अल्पवयीन गर्भवती मुलीने यू ट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती  केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिने बाळाला जन्म दिला मात्र बाळाचा मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.  पोलिसांना तरुणाविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोस्टमार्टमनंतरच बाळाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते समजेलही. पण मुलीच्या आयुष्याचे काय? अडचण म्हणजे त्या मुलीला त्या तरुणाचे पूर्ण नावही माहित नाही.  त्यामुळे तो कोण? आणि तो पुढे येईल काय? आलाही तर पुढे काय?  त्या आईवर आलेला प्रसंग उद्या कुठल्याही आईवर  येऊ शकतो. तेव्हा  आयांनो, वेस्टर्न कल्चरच्या  फार आहारी जाऊ नका.   आपले घर आणि घातली कोवळी मुलं जपा. त्यांना चांगले संस्कार द्या.  चारित्र्याचे महत्व समजून सांगा. कारण पुढचे आयुष्य त्यांनाच जगायचे आहे.

 393 Total Likes and Views

0 Comments

No Comment.