बारावीच्या पेपर फुटीमागे मोठे रॅकेट

News
Spread the love

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताच्या पेपर फुटीमागे मोठी भानगड असल्याची माहिती समोर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या तपासावरुन एका मोठ्या रॅकेट अंतर्गत  गणिताचा पेपर फोडण्यात आल्याचे दिसत आहे. फोडाफोडीचे हे काम  राज्यभर झाले  असेल तरच गणिताचा पेपर रद्द होऊ शकतो. सध्यातरी दोनच जागा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे मुलांना तसे टेन्शन नाही.

             बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे, राजेगावप्रमाणेच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावरूनदेखील बरोबर १० वाजून १७ मिनिटांनी हा पेपर एका व्हाटसअपग्रूपवर व्हायरल झाला होता. त्यामुळे राजेगाव येथील पेपरफुटीचे मुंबई कनेक्शन लक्षात येते. एकेका विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेऊन हा पेपर फोडण्यात आल्याचा संशय  आहे. डीवायएसपी यामावार यांच्या  नेतृत्वात साखरखेर्डा पोलिसांनी केलेल्या  तपासात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन शिक्षकांनादेखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.

            राजेगाव येथील पेपरफुटीप्रकरणाचे राज्यस्तरीय धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता असून, हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबईतील दादर येथील डॉ. अ‍ॅण्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून या पेपरचा काही भाग मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे.     मुंबईतील दादरमध्ये गणिताचा पेपर सुरू होण्याआधी १० वाजून १७ मिनिटांनी एकाच व्हाटसअप ग्रूपवर या पेपरची दोन पाने व्हायरल झाली होती. बरोबर त्याच वेळेस राजेगाव (ता. सिंदखेडराजा) येथील काही विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला होता. त्यामुळे या पेपरफुटीच्या कनेक्शनचाही तपास पोलिस करत आहेत. तसेच, राज्यभरात आणखी कुठे कुठे अशाच पद्धतीने पेपर फुटला? याचाही तपास मुंबई पोलिस करत आहेत. पेपरफुटीसाठी  ज्या व्हॉटसअप ग्रूपचा वापर करण्यात आला त्यात एकूण ९० जणांचा समावेश होता. त्यात काही शिक्षक, विद्यार्थी आणि इतरही काही व्यक्ती होते.  पेपरफुटीची बातमी बाहेर  येताच हा व्हाटसअप ग्रूप डीलिट करण्यात आला. तरीदेखील  मुंबई पोलिसांनी हा डीलिट केलेला ग्रूपही शोधून काढला  आहे. त्यामुळे अनेकजण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहेत.

 94 Total Likes and Views

2 Comments
guadalupe March 9, 2023
| | |
I hope you like petite girls with some curves https://snip.ly/6327oi
misty March 6, 2023
| | |
Follow me to the bed, so I can spread for you https://is.gd/dBsd60