आला H3N2 इन्फ्लुएंझा, घेतला पहिला बळी

Editorial
Spread the love

H3N2 इन्फ्लुएंझा या व्हायरसमुळे कर्नाटकमध्ये १० दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भारतात इन्फ्लुएंझामुळे झालेला हा पहिला बळी आहे. करोना गेला. मात्र भारतात H3N2 ची प्रकरणं वाढत आहेत. डॉक्टरांनी या प्रकरणी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अजून भीतीचं वातावरण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, काळजी घ्या, मास्क लावा असे सल्ले डॉक्टर देत आहेत.      इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी  दिला आहे.

            मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढले आहेत. इन्फ्लुएंझा व्हायरसचा A सबटाइप म्हणजेच H3N2 या व्हायरसमुळे लोकांना सर्दी-खोकला आणि ताप या आजारांना सामोरं जावं लागतं आहे.  इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे की,  सध्या वातावरणातल्या बदलांमुळेही तापाची साथ येते आहे. हा ताप पाच दिवस ते सात दिवस इतका कालावधी राहतो आहे. आयएमएने सर्दी-खोकला आणि ताप आल्यावर अँटी बायोटिक घेण्याचा  सल्ला दिला आहे. काहींचा  ताप तीन दिवसांमध्ये जातो. मात्र सर्दी आणि खोकला तीन आठवड्यांमध्येही जात नाही. प्रदूषणामुळेही १५ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयस्कर लोकांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप येण्याचं प्रमाण वाढलं आहे.  जीवजंतू येत राहणार. आपण आपली काळजी घेतलेली बरी.                                      

 328 Total Likes and Views

0 Comments

No Comment.