भयंकर…सुनेचं मासिक पाळीतलं रक्त विकलं

Analysis
Spread the love

विज्ञानाच्या प्रगतीने जग मुठीत आले आहे. दररोज नवनव्या माहितीचा स्फोट होतो आहे. पण अजूनही अनेक घरी ही प्रगती पोचलेली नाही. आजही अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. पुण्यातील कानावर आलेला प्रकार तर भयंकर आहे. एका महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. ह्या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार २७ वर्षीय महिला विश्रांतवाडी भागात राहते. विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस तपास करत आहेत.

 401 Total Likes and Views

0 Comments

No Comment.