विमानात प्रवाश्याने शेजाऱ्याच्या अंगावर लघुशंका केल्याचे प्रकार खूप गाजले. मात्र आता रेल्वेतही हे लघुशंका प्रकरण आले आहे. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या टीटीईवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. रेल्वेने या टीटीईला कामावरून काढून टाकलं आहे.
दोन दिवसापूर्वीच्या ह्या घटनेत पीडित महिला तिच्या पतीसोबत अकाल तख्त एक्सप्रेसने अमृतसरला जात होती. ती तिच्या सीटवर झोपलेली असताना तिच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यानंतर ती उठली आणि ओरडू लागली. त्याचवेळी तिच्या पतीने टीटीईला पकडलं. त्यानंतर इतर प्रवासीदेखील उठले. आणि चोप दिला. हा टीटीई नशेत होता असं सांगितलं जात आहे. मुन्ना सहारनपूर येथे रेल्वेत टीटीई म्हणून काम करत होता. तो या ट्रेनमध्ये कामावर नव्हता. मुन्ना कुमार नशेत होता की नाही याचीदेखील चौकशी केली जात आहे.
304 Total Likes and Views