उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या गाण्याबद्दल चर्चेत असतात. पण एका वेगळ्याच प्रकरणात त्या पुढे आल्या आहेत. अमृता यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अनिष्काने अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देऊ करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता ही सगळी माहिती समोर आली आहे.
डिझायनर असल्याचे सांगून अनिश्काने अमृताशी सलगी वाढवली. दीड वर्षापासून ती अमृताकडे येतजात होती. अनिष्का हिने अमृता फडणवीस यांच्याकडे काही बुकींविषयी माहिती मागितली होती. या मोबदल्यात अनिश्का १ कोटी रुपये द्यायला तयारी होती. बुकींच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी आणि वडिलांना एका गुन्हेगारी प्रकरणातून सोडवण्यासाठी अनिष्काने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
अमृता फडणवीस यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या आलेल्या तक्रारीनुसार, अनिष्काने १८ आणि १९ फेब्रुवारीला एका अज्ञात मोबाईल नंबरवरुन त्यांना एक व्हिडिओ क्लीप, मेसेज आणि व्हॉईस नोट पाठवली. त्यानंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांकडून अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे धमकावण्यात आले. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० ब ( कट रचणे), भ्रष्टाचार कायदा १९८८ मधील कलम ८, कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
92 Total Likes and Views