ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला होता. ज्यात या व्यक्तीने दोन विवाह केले होते. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी तिघांचे समुपदेशन करून वाद मिटवला. ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात पती तीन-तीन दिवस दोघींसोबत राहणार असा करार दोन पत्नी आणि पतीमध्ये झाला आहे. रविवारी पतीला सुट्टी असेल. म्हणजे त्याला जे वाटेल ते तो रविवारी करू शकणार आहे. पतीने दोन्ही पत्नींना प्रत्येकी एक फ्लॅट दिला आहे. शिवाय पतीच्या ७५ हजार पगारापैकी अर्धा पगारही दोघींना दिला जाणार आहे.
पती हरयाणातील एका मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनिअर आहे. २०१८ मध्ये त्याचं लग्न झालं होतं. बराच काळ ते एकत्र होते. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला ग्वाल्हेरमधील आपल्या माहेरच्या घरी सोडले. तो हरयाणाला परतला. तिथल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्या व्यक्तीने तिच्याशी दुसरे लग्न केले. जेव्हा पहिल्या पत्नीला याची माहिती मिळाली, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि तिने ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल केली.
पतीने दुसरे लग्न केले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहासाठी न्याय हवा, अशी तक्रार पहिल्या पत्नीने केली. प्रकरण कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दीवाण यांच्याकडे गेलं. दिवाण यांनी दोन्ही पत्नी आणि नवरा यांना फोन करून तडजोडीचा मार्ग शोधला. सहा महिन्यांच्या वाटाघाटींनंतर पती आठवड्यात एका पत्नीकडे तीन दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहणार असे ठरले. रविवारी तो पूर्णपणे मोकळा असेल. या वेळेत तो त्याला पाहिजे तिथे जाऊ शकतो. त्यानंतर पत्नी आणि पती दोघांनीही यावर सहमती दर्शवली. देशातील अनेक नवरे आता हरीश दिवाण यांना शोधात असतील. कारण दोन लग्न करणाऱ्या तरुणांची संख्या आपल्याकडे कमी नाही.
699 Total Likes and Views