मुलीने केले आईचे तुकडे, तीन महिने लपवले, पण पुढे?

News
Spread the love

प्रदूषण  केवळ हवेत नाही, ते नातेसंबंधातही आलं आहे. आई ही आई राहिलेली नाही आणि मुलं ही मुलं राहिलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर नावाच्या तरूणीचीही तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली होती आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये लपवले होते.  त्या नंतर हत्या करून  तुकडे घरातच लपवण्याचा नवा ट्रेंड आलेला दिसतो. दररोज तशा बातम्या येतात. पण ताजी बातमी धक्कादायक आहे.  मुंबईत एका मुलीने आपल्या आईची हत्या केली, पुढे  तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे घरात मिळेल त्या जागी लपवले होते. तब्बल  तीन महिने आपल्या आईच्या मृतदेहांच्या तुकड्यांसोबत ही मुलगी राहिली. हे तुकडे या मुलीने कपाटात, फ्रिजमध्ये, पाण्याच्या ड्रममध्ये ठेवले होते.  वीणा जैन असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर रिंपल जैन असं पोलिसांनी अटक केलेल्या तरूणीचं नाव आहे.

                  हा खून उजेडात आला नसता. पण भावाच्या  संशयाने कोडे सुटले.पोलिसांनी  सांगितले की, “रिंपलचा चुलत भाऊ तिच्या घरी पैसे देण्यासाठी गेला होता. वीणा जैन दिसत नसल्याने कुठं आहे, असं भावाने रिंपलला विचारलं. तर, ती कानपूरला गेल्याचं तिने म्हटलं. पण, संशय आल्याने त्याने रिंपलला दरवाजा उघडण्यास सांगितलं. जेव्हा तो घरात गेला, त्याला दुर्गंधी पसरल्याचं लक्षात आलं.” त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घरातून तुकडे झालेला वीणा जैन यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा शेजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की तीन महिने आपल्याला काहीच कसं कळलं नाही?

          झडतीत पोलिसांना घराच्या कपाटात प्लास्टिकचं एक पाकिट मिळालं. ते  उघडल्यावर त्यात विणाचे  शीर मिळालं.  फ्रिजमध्ये, ड्रममध्ये तसंच घरातल्या विविध ठिकाणी असेच तुकडे सापडले. पाण्याच्या टाकीत हात-पाय सापडले. सुरूवातीला पोलिसांनी रिंपलला या घटनेबाबत विचारलं तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिने असंही सांगितलं की आईचा मृत्यू आपोआप झाला. मात्र पोलिसांनी जेव्हा विचारलं की आईच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात आणि इतर ठिकाणी कसे पोहचले ? मात्र  त्याची उत्तरं रिंपलला देता आली नाहीत. रिंपलला अटक करण्यात आली आहे. मात्र  तिने हत्या का केली? कधी केली? तुकडे कसे केले? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळणं बाकी आहे.

 104 Total Likes and Views

0 Comments

No Comment.