सचिन तेंडूलकर. क्रिकेटचा देव. त्याचे रेकॉर्ड्स तुम्हाला माहित असतील. मात्र तो दहावी फेल आहे हे तुम्हाला माहित आहे का? सचिनचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. क्रिकेटवर फोकस ठेवल्यामुळे सचिन दहावी पास होऊ शकला नव्हता. वयाच्या १६ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला होता. खेळाच्या नादात शाळा मागे पडली. सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावरून कोणी असं म्हणणार नाही की सचिन दहावी नापास आहे. कारण त्याची स्मरणशक्ती प्रचंड जबरदस्त आहे. मुला-मुलींनीही शिकताना आपल्या आवडीच्या कुठल्या तरी एका खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. होऊ शकते, तुम्हीही पुढेस्टार व्हाल.
सचिनला त्याच्या प्रत्येक डावाबद्दल माहिती आहे. त्याने कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या सामन्यात किती धावा केल्या, तो कसा बाद झाला, कोणत्या गोलंदाजाने बाद केले, सचिनचा कॅच कोणी पकडला होता हे सर्व त्याला आजही लक्षात आहे. ही गोष्ट वाचल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे. एका कार्यक्रमात सचिनला अँकरने काही प्रश्न विचारले होते. सचिनला विचारण्यात आलेले प्रश्न असे होते ज्याची उत्तरे गुगल किंवा अन्य कोणाच्या मदतीशिवाय देणे अवघड होते. पण सचिनने प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर दिले, जे ऐकून सारे हैराण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी १९८९ मध्ये पाकिस्तान विरुध्द आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. त्याने भारतीय संघासाठी २०० कसोटी, ४६३ वनडे सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने ५३.७९ सरासरीने १५ हजार ९२१ धावा केल्या ज्यात त्याने ५१ शतक, ६८ अर्धशतक आणि ६ द्विशतकं केली. वनडे क्रिकेटमध्ये सचिनने ४४.८३ च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा केल्या. या फॉर्मेटमध्ये सचिने ४९ शतकं, ९६ अर्धशतकं आणि एक द्विशतक शतकं झळकावले होते. फक्त फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही सचिने कमाल दाखवली होती. कसोटीत ४६ आणि वनडेमध्ये त्याने १५४ विकेट घेतल्या होत्या.
555 Total Likes and Views