ऑटोमेटेड टेलर मशिन म्हणजे एटीएममध्ये २००० रुपयांच्या नोटा भरणे किंवा न भरण्याबाबत बँकांना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले. त्या म्हणाल्या, स्वतः किती रुपयांच्या नोटा कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये लोड करायच्या आहेत हे धनको स्वतः ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१७ अखेर आणि मार्च २०२२ अखेरीस ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ९.५१२ लाख कोटी रुपये आणि २७.०५७ लाख कोटी रुपये होते.
अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, बँकांना एटीएममध्ये २,००० रुपयांच्या नोटा न भरण्यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत. बँका एटीएममधील रकमेचे मूल्यांकन करून ग्राहकांच्या गरजा, हंगामी ट्रेंड इत्यादींच्या आधारावर कोणत्या नोटांची अधिक आवश्यकता आहे त्या एटीएममध्ये भरतात.
सीतारमण यांचे म्हणणे खरे आहे असे मानले तर प्रश्न पडतो , की मग दोन हजाराच्या नोटा कुठे आहेत? एटीएममध्ये त्या का मिळत नाहीत? पूर्वी त्या मिळायच्या. आता का गायब झाल्या? साठेबाजांनी पळवल्या? पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या आजच्या युगात ह्या प्रश्नांचे उत्तर कोण देऊ शकेल? सामान्य माणसाला पडलेले हे कोडे आहे.सत्ता पक्षाने हे कोडे सोडवले नाही तर सामान्य माणूस मतदान करताना ते सोडवू शकतो. भाजप हा धोका केव्हा ओळखणार आहे?
704 Total Likes and Views