राहुल गांंधी आणि त्यांची रद्द झालेली खासदारकी या मुद्द्यावरुन सध्या देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष या मुद्द्यावरुन आंदोलन करत असतानाच राहुल गांधींनी याविषयी पत्रकार परिषद घेतली. ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत’, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. ते म्हणाले,” त्यांनी खासदारकी रद्द करो, मला मारो, काहीही असेल तरीही मी फक्त सत्य पाहतो. मला इतर कोणत्याही गोष्टीत रस नाही. हे माझ्या रक्तात आहे.”
राहुल म्हणतात, मी फक्त एकच प्रश्न विचारतो की अदानी यांच्याकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले? ते पैसे त्यांचे नाहीत, त्यांना कुणीतरी दिले आहेत. त्या २० हजार कोटींची चौकशी करायला हवी. पंतप्रधान मोदी अदानींना का वाचवत आहेत? अदानी भ्रष्ट आहेत, हे जनता जाणते. जे चुकलेत ते दुसऱ्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला कशाचीही भीती वाटत नाही, मला तुरुंगात टाकून तुम्ही मला घाबरवू शकत नाही, हा माझा इतिहास नाही… मी भारतासाठी लढत राहीन. मला संसदेत बोलू दिले जात नाही. संसद अध्यक्षांना मी पत्र लिहिले, पण प्रतिसाद मिळाला नाही. माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले, पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही.
एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की, कोर्टाचा जो निर्णय आला त्यावरुन तुम्ही ओबीसींचा अपमान केला असा प्रचार तुमच्याविरोधात करत आहे, यावर तुमची भूमिका काय? हा प्रश्न येताच राहुल गांधी भडकले ते म्हणाले, आत्ताच्या आता पत्रकारांनी तीन वेळा याबाबत प्रश्न विचारला. आपण इतकं थेटपणे भाजपसाठी का काम करता आहात. करत असाल तर ते देखील चर्चेद्वारे करा, जर तुम्हाला भाजपचं काम करायचं तर तसा भाजपचा बॅच छातीवर लावून फिरा. तेव्हा मी तुम्हाला आत्ता जसं उत्तर दिलं तसंच उत्तर देईन. आम्ही पत्रकार आहोत असं दाखवू नका….हवा निकल गई क्या?
राहुल गांधी उठसुठ सारा मामला अडाणी यांच्यावर नेऊन सोडतात. माझ्या पुढच्या भाषणाने मोदी घाबरले म्हणून त्यांनी माझी खासदारकी रद्द केली असे राहुल म्हणाले. पण मोदी हे राहुल घाबरतात ह्या पेक्षा चांगला विनोद कुठला असू शकतो? ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल सुधारले, पप्पू राहिले नाहीत असे लोक मनात होते. पण येरे माझ्या मागल्या. त्यांच्या अशा वागण्याने कॉंग्रेसचे नुकसान ठरले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. २०२४ मध्ये भाजप ४०० जागांच्या जवळ जाईल.
46 Total Likes and Views