मोठी बातमी… राहुल गांधींची खासदारकी रद्द

News
Spread the love

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’  असा सवाल करणारे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दणका बसला आहे.  मानहानीच्या खटल्यात  सुरत सत्र न्यायालयाने  राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ह्या निकालानंतर २४ तासाच्या आत त्यांची खासदारकी गेली.  लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका  आहे.

        गेल्या आठवडभरापासूनच संसदेत राहुल गांधी यांच्या लंडनमधील  एका वक्तव्याविरोधात भाजपचे खासदार आक्रमक झाले होते. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज अनेकदा तहकूब झाले होते. अशातच सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालायत अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यासाठी राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१९ साली राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यापैकी अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणींना पराभव केला होता. मात्र, वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडून आले होते.

              राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर टीका करताना मोदी या आडनावावरुन टिप्पणी केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात निकाल देताना सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. २४ तासाच्या आतच   राहुलबाबाचा फैसला झाला.

 129 Total Likes and Views

0 Comments

No Comment.