आणखी एका नटीची आत्महत्या

Entertainment
Spread the love

सिनेमाचे जग झगमगाटी असतं.  तरुण मुलं-मुलीना विलक्षण आकर्षण असतं. पण हा भूलभुलय्या आहे.  मानाने खंबीर मुळीच इथे टिकतात. बाकींच्या नशिबी निराशाच येते. त्यातून   काही आयुष्यच संपवून टाकतात. हल्ली  नट्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली.  अवघ्या २५ वर्षे वयाची अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या केली आहे. शूटिंगनंतर ती हॉटेलमध्ये गेली आणि तिथे आत्महत्या केली.

             आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वी तिचे ‘ये आरा कभी हरा नही’ हे शेवटचे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याचा व्हिडिओ पवन सिंग आणि आकांक्षा यांच्यावर शूट करण्यात आला आहे.या गाण्याच्या व्हिडिओला काही वेळातच ४  लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावरून  आकांक्षाची लोकप्रियता लक्षात येते. पवन सिंगसोबत काम केल्यानंतर आकांक्षा दुबेला फिल्मी दुनियेत चांगली ओळख मिळाली. त्यानंतर तिच्यामागे बड्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागली होती. एका चित्रपटासाठी ती दोन लाख रुपये घ्यायची. आकांक्षा दुबेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेता समर सिंगला डेट करत होती. ती समर सिंहसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती.  रोज सोशल मीडियावर समर सिंहबद्दलचे प्रेम व्यक्त करत असे. आकांक्षा आणि समरची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आकांक्षा दुबेने इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करून समर सिंहसोबतचे नाते अधिकृत केले. तिच्या इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीला पाहिल्यानंतर तिचं ब्रेकअप झालं होतं का असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.

       आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येसाठी तिच्या आईने भोजपुरी गायक समर सिंहला जबाबदार धरलं आहे. समर आणि त्याच्या भावाने माझ्या मुलीची  हत्या केल्याचा दावा ह्या आईने  केला आहे. समर सिंह हा रविवारपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  पोलीस तपास करतील, गुन्हेगाराला शिक्षाही होईल. पण गेलेली कोवळी थोडीच परत येणार आहे?

 188 Total Likes and Views

0 Comments

No Comment.