कीर्तनाबरोबर वादग्रस्त वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध असणारे ह.भ.प. इंदुरीकर महाराज आपल्या कमाईवर समाधानी नाहीत का? महाराजांनी नृत्यांगना गौतमी पाटीलवर निशाणा साधल्याने हा प्रश्न त्यांच्या भक्तांना पडला आहे. तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
इंदुरीकर महाराज किर्तनासाठी खूप पैसे घेतात, अशी ओरड सुरू झाल्यावर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आपल्या कीर्तनातून दिलं होतं. ते म्हणाले होते की, मलासुद्धा संसार आहे. बायको, मुलं आहेत. तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरवून पैसे घेत नाही. कोणीतरी सांगावं की, कीर्तनासाठी महाराजांनी एवढ्या पैशातच होईल असं सांगितलं.
महाराज एका कीर्तनासाठी साधारण ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत घेतात असे बोलले जाते. महाराजांची प्रसिद्धी भरपूर असल्याने त्यांची मागणीही मोठी आहे. त्यामुळे महाराजांच्या तारखा सर्व अॅडव्हांस्ड बुक असतात. त्यांचे रोजचे तीन व्याख्यानं असतात.यावरून महाराजांची कमाई मोजा. महाराजांनी त्यांच्या एका कीर्तनात म्हटले आहे की, साधारण २०१८च्या सुमारास त्यांंनी १३ वी स्कॉर्पिओ घेतली. ते म्हणाले की, कीर्तनासाठी मी एवढा फिरतो की, मी आता १३ वी स्कॉर्पिओ गाडी घेतली आहे. मला फक्त ११ महिने गाडी टिकते. अकराव्या महिन्यात गाडी वाजायला लागते. आता तर ३ महिन्यातच वाजायला लागते.
महाराजांचं मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील इंदोरी. पण महाराज सध्या संगमनेर तालुक्यातील ओझर गावात स्थायिक आहेत. महाराजांच्या लग्नाला साधारण २० वर्ष झाल्याचे जवळचे लोक सांगतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. महाराज बीएस्सी बीएड आहेत.महाराजांच्या पत्नी शालिनी देशमुख या स्वतः कीर्तनकार आहेत. सारा कसा आनंदी आनंद असताना इंदुरीकर महाराज असमाधानी का? पुढच्या व्याख्यानात महाराजांच्या उत्तराची त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा असणार.
185 Total Likes and Views