कोरोना नेहमीसाठीचा पाहुणा म्हणून आलाय असे वैज्ञानिकांनी पूर्वी म्हटले होते. दोन वर्षे धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना कमी झाला तेव्हा लोकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र तेव्हाही काळजी घ्या असे वैज्ञानिक सांगत होते. आता नको तेच घडतेय. देशभरात कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा जोर पकडलाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.
कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, देशभरात कोरोनाची एकूण २१५१ प्रकरणं नोंदली गेली आहेत. गेल्या २४ तासांत पाच महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत १२२२ लोक बरे झाले आहेत. कोविडची सक्रिय प्रकरणं आता ११हजार झाली आहेत. यापूर्वी, काल म्हणजेच मंगळवारी देशात १५७३ कोरोना रुग्ण आढळले होते.
महाराष्ट्रात कोरोनानं थैमान माजवायला सुरुवात केली असून तिघांचा बळी घेतला आहे. तर, उत्तर प्रदेशात गेल्या ११ दिवसांत कोरोनाचे रुग्ण चार पटीनं वाढले आहेत.
तेव्हा काळजी घ्या. तुम्ही गुंडाळून ठेवलेले मास्क बाहेर काढा. गर्दीत जाऊ नका. फारच आवश्यक असेल तर मास्क घालून जा. पूर्वीचे दिवस नको असतील तर काळजी जरुरी आहे. कारण कोरोना नावाचा शत्रू अदृश्य आहे.
289 Total Likes and Views