भरपूर दारू ढोसून विमानात बसण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले दिसत आहेत. काहींना दारू चढते आणि मग ते विमान आकाशात असताना नको थेर करतात. विमानात लघुशंका केल्याच्या बातम्या तर वाढल्या आहेत. नुकताच आणखी एक प्रकार घडला आहे. बिचारी हवाईसुंदरी, तिला सारे निस्तरावे लागले. इंडिगोच्या गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या 6E 762 या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने भरपूर दारू प्यायली होती. विमान प्रवासादरम्यान हा प्रवासी टॉयलेटला जाण्यासाठी उठला. मात्र नशेच्या अवस्थेत त्याने विमानाच्या फरशीवरच उलट्या केल्या. एवढेच नाही तर यानंतर त्याने टॉयलेटच्या बाहेर लघवी केली. तो इतका दारूच्या नशेत होता की, त्याला टॉयलेटच्या बाहेर लघवी केल्याचेही कळले नाही.
उलटीचा वास मारणाऱ्या वातावरणात इतर प्रवाशांना बसणे कठीण झाले होते. त्यामुळे ऑन-बोर्ड एअरहोस्टेसला विमानाच्या फरशीवर पडलेली उलटी पुसावी लागली. ही घटना गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार हातळणाऱ्या एअर होस्टेसचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
याआधी एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने वृद्ध सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती. विमानतळाचे तर केव्हाच एसटी स्थानक झाले आहे. आता विमानातही कुठल्या दर्ज्याचे लोक अलीकडे येऊ लागले आहेत याचा हा नमुना आहे.
66 Total Likes and Views