आता ब्राम्हणमुक्त मंदिरं?

Analysis
Spread the love

नाशिकच्या  काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वेदोक्त विरुध्द पुराणोक्त असे ह्या वादाचे स्वरूप आहे.

            राम नवमीनिमित्त संयोगीताराजे छत्रपती यांनी काळाराम मंदिरास भेट देऊन  पूजा केली. मात्र, या पूजेवरून वाद निर्माण झाला आहे. मंदिराच्या महंतांनी पूजा पुराणोक्त पद्धतीनं करण्यास सुरुवात केल्यानंतर संयोगीताराजे छत्रपती यांनी या पूजेला विरोध केला. त्यांनी महंतांना पूजा वेदोक्त पद्धतीनं करण्यास सांगितले. मात्र, त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न महंतांनी केल्याचा दावा संयोगीताराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील टाकली होती. या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात मराठा सेवा संघाने देखील उडी घेतली आहे.

            छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचं अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे. तसेच आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे, ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन सामजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. खेडेकर यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

           मराठा सेवा संघ ह्या  संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी राज्यातील सर्व मंदिरांमधून ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी केली. सर्व मंदिर भटमुक्त करून मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करा, असे त्यांनी म्हटले. देवस्थांनांचा पैसा गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरावा. मंदिर भटमुक्त करण्यासाठी पुढील काळात राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी  जाहीर केले.

 897 Total Likes and Views

0 Comments

No Comment.