“गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या साबणामुळे स्त्रीचं सौंदर्य अबाधित राहतं. इतिहासातली एक प्रसिद्ध राणी होऊन गेली.. तिचं नाव होतं क्लिओपात्रा. क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधाने अंघोळ करत होती.”
हा ब्युटी फंडा दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाही तर थेट असा मनेका गांधी यांचा आहे. गाढविणीच्या दुधाचे महत्व सांगणारा मनेका यांचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे.
ह्या व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, की सध्या गाढवांची संख्या कमी झाली आहे. धोबीही कपडे वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करत नाहीत. लडाखमध्ये एक समुदाय आहे ज्यांनी हे निरीक्षण नोंदवलं की गाढवांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे त्यांनी गाढविणीच्या दुधापासून साबण तयार करण्यास सुरूवात केली. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेल्या साबणाने अंघोळ केल्यास स्त्रीचं शरीर कायम सुंदर राहतं. दिल्लीत गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला साबण ५०० रूपयांना विकला जातो. आपण बकरीच्या दुधापासून किंवा गाढविणीच्या दुधापासून साबण का तयार करत नाही?”
मनेका गांधी गाढविणीच्या दुधाचं महत्त्व सांगून त्यापासून साबणाची निर्मिती करण्याचं आवाहन करत आहेत. हा व्हीडिओ सुल्तानपूरच्या बल्दीराय आयोजित एका कार्यक्रमातला आहे. सध्या झाडं गायब होताना दिसत आहे त्यामुळे लाकडं महाग झाली आहेत. गरीबाच्या घरात मृत्यू झाला तर लाकडांचाही बराच खर्च होतो. त्यापेक्षा शेणापासून गोवऱ्या थापा, त्या साठवा. गोवऱ्यांच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करा असाही सल्ला मनेका देतात.
900 Total Likes and Views