“आना है तो जाना है” हे सर्वांना कळते. पण जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच माणूस अस्वस्थ होतो. मी गेल्यावर माझ्या मुलाबाळांचे काय होणार? याची चिंता त्याला छळत असते. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय?” असे कवीने म्हटले आहे. पण मी गेलो तर बरेच काही राहील असेच प्रत्येकाला वाटत असते. पण डोन्ट वरी. वैज्ञानिक तुमचे टेन्शन लवकरच दूर करीत आहेत. लवकरच म्हणजे २०३० पर्यंत माणूस खरोखरच अमर होणार आहे. एका इंजिनीयरनं लिहिलेल्या टेक्नोलॉजी संबधित पुस्तकातील काही दाव्यांमुळे या चर्चा होऊ लागल्या आहेत. गूगल या जगविख्यात कंपनीमध्ये आधी काम करणारा एक इंजिनीयर रे कुर्झ्वेल याने लिहिलेल्या The Singularity Is Near या एका पुस्तकात केलेल्या काही खळबळजनक दाव्यांमुळे मनुष्य हा प्राणी लवकरच अमर होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे हा दावा करणारा शास्त्रज्ञ सडकछाप नाही. त्याच्या ८६ टक्के भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या झाल्या आहेत.
रे याने २००५ मध्ये एक पुस्तक लिहिलं ज्याच नाव होतं The Singularity Is Near. या पुस्तकात केलेल्या काही दाव्यांनुसार माणूस २०३० पर्यंत अमर होणार असून जेनेटिक्स, नॅनोटेक्नोलॉजी, रोबोटिक्स या काही गोष्टींमुळे हे शक्य होणार असं सांगितलं गेलं आहे. २०२९ पर्यंत मनुष्य तंत्रज्ञानामध्ये इतकी प्रगती करेल की तो थेट अमर होऊ शकेल. माणूस तोवर नॅनो टेक्नोलॉजी, रोबोटिक्स या सर्वाच्या मदतीने एज रिवर्सिंग नॅनोबॉट्स बनवेल. तर या बॉट्समुळे शरीरात खराब होणाऱ्या टिशू आणि सेल्सला लगेचच दुरुस्त करायला मदत होणार आहे, ज्यामुळे माणसाचे वय वाढणारच नाही. त्यामुळे थोडी कळ काढा. तुम्हीही अमर होऊ शकता.
93 Total Likes and Views