एमडब्ल्यूएमचा ‘भारतीय नारी रत्न अवार्ड’ समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचे सामर्थ्य मातांमध्ये : प्रगती पाटील

Uncategorized
Spread the love

मुलीच्या संरक्षणासोबतच मुलांना संस्कारित करण्याचे काम महिलांना करावे लागते. कारण, समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचे सामर्थ्य मातांमध्येच आहे, असे प्रतिपादन नागपूर मनपा महिला आणि बाल विकास स्थायी समितीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांनी केले.
नॅशनल वेब मीडियातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या ‘भारतीय नारी रत्न पुरस्कार 2023’ कार्यक्रमाच्या आयोजनप्रसंगी त्या  बोलत होत्या.


नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगती पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शरद गोपीदासजी बागडी तसेच धरमपेठ मल्टी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष नीलिमा बावणे उपस्थित होत्या. अर्चना तिरमारे यांनी संचालन केले, तर ‘नॅशनल वेब मीडिया’ चे संचालक महेश श्यामकांत पात्रीकर यांनी आभार मानले. मार्केटिंग विभागाचे प्रशांत लांजेवार यावेळी उपस्थित होते.
नॅशनल वेब मीडियातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना  ‘भारतीय नारी रत्न पुरस्कार 2023’ अंतर्गत प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. नॅशनल वेब मीडियातर्फे सलग 6 वा भारतीय नारी रत्न पुरस्कार 2023 चे आयोजन प्रेस क्लब ऑफ नागपूर येथे करण्यात आले होते. देशभरातील महिलांनी त्यांचे नामांकनआणि प्रोफाइल पाठवले होते.


*भारतीय नारी रत्न पुरस्कार :* आस्था गर्ग – टैरो रीडर एंड लाइफ कोच नवी दिल्ली, चित्रलेखा पोटनीस ओनर ऑफ़ पील कॉलेज ऑफ़ प्रोफेशनल स्टडीज कनाडा, नंदिका शर्मा स्पिरिचुअल हीलर देहरादून, डॉ. नेहा उपाध्याय – डेंटल प्रोफेशनल लखनऊ, रेखा एकबोटे – वाईस प्रेजिडेंट एंटी करप्शन इंटेलिजेंस कमिटी पुणे, रोहिणी साळुंके – डिरेक्टर ऑफ़ वाटरकॉर्प एंड एकोमाटिक वेंचर्स  मुंबई, बेबी चक्रबोर्ती – फ्लिम डिरेक्टर एंड राइटर कोलकाता, सुषमा गायकवाड़ – विदर्भा प्राइड,  मोहिनी मैडमवार – इंटरनेशनल ग्लैम आइकॉन  २०२३ विनर,  वैशाली ठाकूर – प्रोप्रायटर फिटजोन, अश्विनी चौलवर – वुमन आइकॉन ऑफ़ द ईयर, ओपिंदर कौर भसीन – सोशल एक्टिविस्ट, हरमीत चौधरी – ब्यूटी एडवीज़र. सोनिया परमार – औनर ऑफ़ नागपूर लेडीज क्लब, स्वाती थाओरे  – मॉडल इन्फ्लुएंसर, रचना शर्मा – फिटनेस कोच, नालंदा इंदूरकर – इंटनेशनल ग्लैम आइकॉन विनर, शैल जैस्वाल – टेक्सटाइल डिज़ाइनर, किरण भेले – डायरेक्टर ऑफ़ डांस अकादमी,  रशमी तिरपुडे – डिरेक्टर ऑफ़ र के  हियरिंग इंडिया, कविता डम्भारे – समाज सेविका, रोशनी केवल सेम्बेकर – शिक्षक, एडवोकेट  नेहा अग्रवाल – सामाजिक कार्यकर्ते, नेहा वीरेंदर बिसेन – डांस टीचर एंड फिटनेस इंस्ट्रक्टर,  दीप्ती चाचरा – ओनर ऑफ़ विजडम वर्ल्ड, सुकूनात क्वाज़ी – फिंगर आर्टिस्ट, रक्षंदा पाटने – ड्रेस डिज़ाइनर, माही राजेंद्र काडेकर – मेकप आर्टिस्ट, शिब्ली अहतसमि – उद्योजिका, कविता वाकोड़े वानखेड़े – मिसेस इंडिया विनर २०२१, अर्चना तिरमारे – एंकर एंड मॉडल  नागपूर.

 57 Total Likes and Views

0 Comments

No Comment.