अभिव्यक्ती स्वातंत्र्य , व्यक्ती स्वातंत्र्य याचा पुरेसा फायदा उठवून व्यक्तिद्वेषाचा अतिरेक करत तुम्ही बेजबदार बोलत राहिलात ! मोदी द्वेष या एकमेव आजाराने तुम्ही पछाडले गेले आहेत आणि त्यामुळे मोदींना घडवणारा संघ आणि मोदींचे दैवत सावरकर यांचा पण तुम्ही अतोनात द्वेष करत आहात .
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही ! एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेला , ज्याच्या आईने मुलांना शिकवण्यासाठी धुणी भांडी घासली ! ज्याने वडिलांना चहा विकण्यासाठी मदत केली !असा
माणूस तुम्हाला आव्हान देत गेली तीन दशके जवळपास लढतो आहे ! यशस्वी होतो आहे ! हे तुम्हाला कसे सहन होणार ? कारण या देशात सत्तेवर बसण्याचा तुम्ही ताम्रपट घेऊन आलेले आहात असा तुम्हाला भ्रम झालेला आहे .
या भ्रमामुळे सत्ता वियोगातून तुम्ही संपूर्ण परिवार अस्वस्थ होत असतात आणि त्यातून जन्म होतो व्यक्ती द्वेषाचा ! जन्म होतो उर्मट पणाचा ! जन्म होतो अहंकाराचा ! हे गेल्या तुमच्या तीन पिढ्यापासून आम्ही भारतीय बघत आलो आहोत !
तुमचे पणजोबा असेच अस्वस्थ होते जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बहुमताने काँग्रेसचे अध्यक्ष झाले . या द्वेषामुळे नेताजींना भारताच्या बाहेर जावे लागले ! स्वतंत्र भारतात त्यांच्या गूढ मृत्यूचे कधीच कोडे उलगडले नाही .
सुभाषबाबू यांच्यावर झालेल्या अन्यायकारक वागणुकीची तुमच्या पणजोबांनी कधी माफी मागितली नाही , त्यामुळे तुम्ही पण माफी मागू नका !
सावरकर आणि संघ द्वेष तर तुमची खानदानी परंपरा आहे . या द्वेषातून तुमच्या पणजोबांनी गांधी हत्येच्या खोट्या आरोपात संघाला , सावरकरांना गोवले , जेल मध्ये टाकले , बदनाम केले पण कोर्टाने ना संघाला दोषी ठरवले ना सावरकरांना ! पण तुमच्या पणजोबांनी माफी मागितली नाही , त्यामुळे तुम्ही पण माफी मागू नका !
पाकिस्तानच्या पहिल्या हल्ल्यात तुमच्या पणजोबांनी काश्मीरचा काही भाग pok बनवून टाकला ! जणू पाकिस्तानला आंदण म्हणूनच देऊन टाकला ! आज पर्यंत आम्ही परत तो भूभाग मिळवू शकलो नाही त्याची ना त्यांना खन्त ना तुमच्या खानदानाला खेद ! मग माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही !
६२ च्या युद्धात तुमच्या पणजोबाच्या चीन प्रेमापोटी आम्ही आमचा भूभाग गमावला . पुरेशा सुविधांचा अभाव असल्यामुळे आमच्या शूर सैनिकांना प्राण गमवावे लागले ! सैन्याला पराभव स्वीकारावा लागला !
पण त्यांनी त्यावेळी कुठे माफी मागितली होती ?
तुमच्या आजीने देशात आणीबाणी आणली ! सेन्सॉरशिप आणली ! लोकांची बळजबरी नसबंदी केली !स्वतःच्या सत्तेसाठी लाखो लोकांना तुरुंगात टाकले ! जयप्रकाश ते आचार्य कृपलानी याना जेल मध्ये टाकले ! पण या कृतीचा तुमच्या आईला आणि काकाला कधी पश्चाताप झाला नाही ! त्यांनी कधी माफी मागितली नाही! मग तुम्ही तरी का माफी मागता ?
तुमचे पिताश्री शीख समुदायाच्या हत्याकांडानंतर खुशाल वर्णन करून मोकळे झाले ‘ मोठ्या वृक्षाच्या कोसळण्याने थोडे फार जमिनीला हादरे बसणारच ‘ त्यामुळे शीख समुदायाच्या हत्येचा कुठलाही विषाद त्यांना वाटला नाही त्यानी त्याबद्दल कधी माफी मागितली नाही मग तुम्ही तरी का मागता माफी ?
तुमच्या नसा नसात एक सरंजामी वृत्ती आहे आणि भारत देश तुम्हाला जहागीर वाटते आहे . पक्ष म्हणजे तुमच्या दावणीचे सैन्य आणि कार्यकर्ते म्हणजे लाचारांची पलटण ! त्यामुळे आणीबाणीत आमच्या मुख्यमंत्र्यांचे तुमच्या काकानी कोट ओढून त्यांना खाली बसवले ! काही दिवसांपूर्वी तुम्ही तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षच्या कोटाचा वापर कशासाठी केला हे सर्वांनी पाहिले . तुमच्या खानदान चे जोडे उचलणारे मुख्यमंत्री तुम्हाला हवे असतात ! राज्यात तुमची लाचारी पत्करली त्यांना तुम्ही मुख्यमंत्री पद बहाल केले यातून अनेक कर्तृत्वहीन माणसे जनतेवर लादली ! महाराष्ट्रातील बाबासाहेब भोसले प्रयोग तुमच्या खानदानी
परंपरेचा ! पंतप्रधान मनमोहन यांचे आदेश पत्रकार परिषदेत फाडणारे तुम्हीच आणि निजलींगप्पा , नीलम संजीव रेड्डी ते सीताराम केसरी तमाम वयोवृद्ध नेत्यांना अपमानास्पद वागणूक देणारे तुमचे खानदान !
गांधी परिवारासाठी झाडू मारायला तयार असणारे किंवा आणीबाणीच्या अध्यादेशावर रबरी स्टॅम्प बनून सही करणारे राष्ट्रपती नेमणारे तुम्ही ! स्वाभिमानी राष्ट्रपती , स्वायत्त न्याय पालिका आणि स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान दीर्घकाळ अस्तित्वात राहणे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या तुमच्या सरंजाम शाहीला मोठे आव्हानच आहे आणि म्हणून राफेल , नोटबंदी , gst , अदानी , अंबानी असे मुद्दे घेऊन जनतेला , जगाला तुम्ही भ्रमित करत सुटला आहात .
परदेशात गेल्यावर तरी तुम्ही बाळगायची ! पण तेथेही प्रछन्न बदनामी करण्याचा कार्यक्रम तुम्ही चालवला आहे .
तुम्ही सावरकर नाही असे नेहमी म्हणतात ! लोकांना हे पक्के माहिती आहे ! सावरकर परदेशात देशाचा स्वाभिमान उंचावण्याचा प्रयत्न करत होते हे विसरू नका!
तुम्ही सावरकर असूच शकत नाही त्यासाठी दोन दोन जन्मठेप शिक्षा भोगाव्या लागतात . बैलासारखे कुलू ला जुंपावे लागते . खानदान आणि नातीगोती विसर्जीत करावी लागतात ! तुमच्या सरंजामी रक्तात त्यागाचा कुठे संबंध येणार ? तुम्हाला तुमचे परदेश दौरे , पब पार्ट्या लखलाभ होवोत !
तुम्ही सावरकर तर नाहीच पण तुम्ही महात्मा गांधी पण नाही तुम्ही तर तोतया गांधी आहात . महात्मा गांधींशी नाते जोडायला जाऊ नका तसे करायला गेला तर खादी वापरावी लागेल . बर्फात खेळता येणार नाही , तुमच्या दीदी बरोबर ! दाढी वाढवून कुणी महात्मा होत नसते आणि महात्मा गांधी तर नक्कीच नाही !
*एका कायदेशीर प्रक्रियेतून तुमच्या बेजबाबदार वक्तव्याची शिक्षा तुम्हाला झाली आहे*
उगाच आदळ आपट करण्यापेक्षा भानावर या
आणि वस्तूस्थिती स्वीकारा ! तुम्ही माफी मागूच नका !
तुम्ही या जनतेला वेठीस धरून आता पर्यंत केलेले शोषण केवळ माफी मागून माफ होईल या भ्रमात राहू नका ! त्यामुळे तुम्ही खरेच माफी मागू नका !
तुमच्या उद्दाम वक्तव्यातून तुम्ही वारंवार देशाचा , समाज समूहाचा , देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचा वारंवार अपमान केला आहे त्यामुळे एका माफितून त्याचे परिमार्जन अशक्य आहे . त्यासाठी तुम्हाला सन्मान जनक शिक्षा एकच आहे ती म्हणजे सामाजिक आणि राजकीय जीवनातून निवृत्ती ! ही शिक्षा स्वतःहून स्वीकारली तर त्यात सन्मान आहे नाही तर जनता जनार्दन सिद्ध आहेच !
आपले हितचिंतक
( *अमोल सराफ * )
भारतीय नागरिक .
भ्रमणध्वनी : 9028141717
तुम्ही माफी मागू नकाच !
62 Total Likes and Views