2023 मध्ये उन्हाळ्यात पुन्हा तापमान आणि उष्ण लहरी वाढण्याची शक्यता

News
Spread the love

जागतिक स्तरावर आणी भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता  आणि ला निनो नंतर वाढत चाललेला अल निनो प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहील.
*2022 सर्वाधिक उष्ण लहरीचे वर्षे*
        मागील 2022 वर्षी मार्च,एप्रिल,मे आणि जून महिन्यात अनेक उष्ण लहरी आल्या होत्या.मार्च 22 मध्ये गुजरात,राजस्थान मध्ये 29,30,31 मार्च रोजीच ऊष्ण लहरी आल्या होत्या.एप्रिल महिन्यात सुद्धा 1,2 तारखेला गुजरात मध्ये तर 26 ते 30 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्ण लहरी आल्या. तसेच 8 ते 15 मे आणि  3 ते 7 जून दरम्यान  विदर्भात उष्ण लहरीचा प्रकोप पहावयास मिळाला होता.महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमान 46 डिग्री पर्यन्त गेले होते तर चंद्रपुर मध्ये तापमान 46.8 पर्यंत गेलेहोते.अति तापमान आणि उष्ण लहरींचे उन्हाळ्यात 30 दिवस होते.हा गेल्या 50 वर्षातील विक्रम आहे.
    वाढत चाललेले ,जंगलतोड,शहरीकरण,औद्योगिकरण,प्रदूषण आणि विशेषता वातावरनातील कर्बवायू चे प्रमाण (420 ppm )हे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्ण लहरीस कारणीभूत आहेत.
  *ऐतिहासिक तापमान वाढ*
  1850 ते 1950 ह्या औद्योगिक काळाच्या पूर्वीचे तापमान पाहता इ.स.2000 नंतरची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की 2000 मध्ये तापमान 0.67 अंशाने वाढले होते,2005 मध्ये ते 0.91 झाले.2010 मध्ये 0.97 अशाने वाढले तर 2014 मध्ये ते 1.00 डिग्रीने वाढले.2014 नंतर प्रत्येक वर्षीचे तापमान 1 डिग्री च्या वर गेलेले होते.गेल्या दोन दशकात सर्वाधिक तापमान वाढ ही 2016 मध्ये 1.28 डिग्रीने वाढले होते.(ह्याच वर्षी 19 मे रोजी राजस्थान मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 51 DC नोंदले गेले)
*अल निनो चा प्रभाव*
2020 पासून 2022 पर्यंत ला नीना चा प्रभाव होता.त्यामुळे देशात चांगला पाऊस पडला,परंतु 2023 च्या सुरवातीला सामान्य(न्युट्रल)स्थिती आली असून पुढे अल निनो चा प्रभाव वाढणार असल्याचे नासा,जागतिक हवामान विभाग आणि इतर हवामान संस्थानी अभ्यासाअंती जाहीर केले आहे.अल निनो च्या प्रभावामुळे उन्हाळ्यात तापमान वाढीस मदत मिळण्याची शक्यता आहे.असे झाले तर 2023 हे वर्ष सुद्धा अत्यंत तापमानाचे वर्ष राहण्याची शक्यता आहे.
————
*प्रा सुरेश चोपणे*,चंद्रपुर
हवामान अभ्यासक
अध्यक्ष
ग्रीन प्लानेट सोसायटी,
सदस्य-इंडियन सायन्स काँग्रेस

 71 Total Likes and Views

1 Comments
janine April 6, 2023
| | |
Would you take a fit girl like me out? http://prephe.ro/Bdsn