स्वामींचा नामजप कसा करावा?

Analysis
Spread the love

असाच जप तुम्ही तुमची इष्ट, आराध्य, आवडत्या देवतेचा सुद्धा करू शकाल। पद्धत तीच राहील। 
नामजप करण्याची सवय कशी लावावी? बर् याच लोकांना एक समस्या असते. ती नामजप करायला बसले की त्यांचे मन इकडे तिकडे भटकत राहते. तोंडातून श्री स्वामी समर्थ निघते पण मन मात्र फिरत असते. दुसरीकडे त्यांना कधीही एकदाची माळ पूर्ण होते याची जास्त चिंता असते ते ठरवतात की त्यांना 11 माळी जप करायचा आहे. परंतु 11 काय त्यांना एक माणूस सुद्धा करताना कंटाळा येतो खरे तर त्यांना नामजप करायचा असतोच.
सेवा ही करायची असते परंतु त्यांचे मन त्यांची साथ देत नाही. मन एका ठिकाणी थांबत नाही, काहींचे तर डोकं दुखायला लागते आणि काहींना झोप येते अशा खूप समस्या  लोकांना भेडसावत असतात, ज्या आपल्या समस्या आहेत स्वतः चा दुसर् याच्या नाही यांना आपण स्वतः दूर करू शकतो आणि रोज नित्यनियमाने नामजपाची सवय स्वतःला लावू शकतो.
आता ही सवय कशी लावावी जेंव्हा नामजप करायला बसाल किंवा नामजप करायला ठरवाल त्या दिवशी आपले हातपाय आणि तोंड स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यावीत स्वामीच्या समोर बसा किंवा जिथे तुम्हाला सोयीस्कर असेल तिथे बसा खुर्ची वर बसू शकता. सोफ्यावर बसु शकता. बेडवर सुद्धा बसू शकता. बेडवर बसू शकता म्हणजे बेडवर बसूनच करायला हवे असे नाही. ज्यांना त्रास आहे हेल्थ इश्शू आहे त्यांनी बेडवर बसावे बसायला त्रास होतो.
त्यांनी खुर्ची किंवा सोफ्यावर बसून नाम जप करावा. बसण्याची व्यवस्था झाली. स्वामी समोर बसलेले असाल तर स्वामी समोर एक अगरबत्ती लावावी आणि बसताना खाली चटई टाकावे. नंतर आपले डोळे बंद करावेत .
श्री कसे बोलतोय स्वामी कसे बोलतोय समर्थ कसे बोलतोय एकेक शब्द बोलताना ओठांकडे आणि जिभे कडे लक्ष द्यावे. आपण हा मंत्र हा स्वामी चा जाप कसा करतोय? प्रत्येक वेळी बोलताना असेच शब्दांकडे लक्ष द्यावे असे केल्याने मन तुमचें भटकणार नाही आणि तुमच्या डोक्यात मनात फक्त श्री स्वामी समर्थ हीच नाम सुरू राहील. आधी 1-2 माळ केली तरी चालेल. हळूहळू सुरू करावे. पहिल्या दिवशी एक माळ नंतर हळूहळू वाढवत जाणे जेव्हा पूर्ण सवय होईल.
डोळे बंद करून स्वामींच्या फ़ोटो कसा दिसतो ते आठवावे. जेव्हा तुम्हाला एकदम सवय होईल की आता तुम्ही व्यवस्थित 11 माळ जाप करताय. त्यानंतर तुम्ही ओठांकडे लक्ष नाही दिले तरी चालते. मग तेव्हा तुम्ही जप करता करता स्वामींच्या फ़ोटो स्वामींची मूर्ती कशी दिसते हे बघण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात विचार करा की स्वामीचा फोटो कसा असतो? स्वामीचा फोटो तुम्हाला स्पष्ट दिसेल. परंतु हे पहिल्या दिवशीच करू नका. नाही तर मंत्र जाप होणार नाही.
फक्त फोटो आठवत बसाल म्हणून आदि जपाची सवय होऊ द्या जाप करता करता तुमच्या ध्यान सुद्धा होईल आणि याने मेडिटेशनचा फायदा तुमच्या मनाला मिळेल. तुम्ही शांत व्हाल पॉजिटिव विचार येतील डोके शांत राहील झोप चांगली लागेल मेडिटेशनचे सगळे लाभ तुम्हाला होतील. दुसरे मेडिटेशन करण्याची तुम्हाला गरज नाही जेव्हा लोक मेडिटेशन करता तेव्हा ओम बोलतात.
आपण श्री स्वामी समर्थ बोलावे अशी ही नामजपाची सवय लागते. तुम्ही ही हे नक्की करून बघा माळ नसेल तर सुरुवातीला पाच मिनिट जप करावा. मग 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास असा नामजप करावा तर मित्रांनो, तुम्ही नामजप सुरू करा याने नुकसान काहीच होणार नाही. फक्त लाभ होईल तुम्हाला आणि परिवाराच्या सदस्यांना सुद्धा अशा रीतीने नाम जप करायला सागा. 
!! श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ !!

 1,174 Total Likes and Views

0 Comments

No Comment.