गेला संपूर्ण आठवडा मी येथे नव्हतो परदेशात होतो थायलंड मधल्या क्राबी बेटावर गेलो होतो, पैसे पाण्यात गेले कारण क्राबी पेक्षा कितीततरी अधिक पटींनी आपले कोकण आणि गोवा राज्य आहे, यापुढे अर्धवट मंडळींच्या सल्ल्यावरून निदान तुम्ही तरी हि चूक करू नका म्हणून हा मोलाचा सल्ल्ला. गेल्या काहीच वर्षात संपूर्ण जगाला दोन देशांनी भुरळ पाडलेली आहे आश्चर्य म्हणजे त्यापैकी एक भारत आहे आणि दुसरा देश अर्थात थायलंड आहे. जगात कुठेही जा अगदी अख्ख्या भारतात देखील कुठेही कानाकोपऱ्यात फिरा, थायलंड आणि भारताची वेगळी कामगिरी जेथे तेथे दिसते त्यापैकी अर्थात थायलंडने बऱ्यापैकी संपूर्ण जगाला बिघडवण्याचे आणि भारताने घडविण्याचे मोठे काम करून ठेवले आहे, घडविण्यात आणि बिघडविण्यात हे दोन्ही देश आजही अजिबात थांबलेले नाही म्हणजे थायलंड बिघडवतोच आहे आणि भारत अख्ख्या जगाला घडविण्याचे मोठे काम करतो आहे.भारताने उभ्या जगाला योगा शिकवून सर्वांना निरोगी ठेवण्याचे आणि दीर्घायुषी करण्याचे मोठे काम हाती घेतलेले आहे किंबहुना रामदेव बाबा यांना मिळालेली जगमान्यता केवळ त्यांनी दिलेल्या योग शिक्षणातून त्यांना मिळालेली आहे त्याचवेळी थायलंडला शोभेल असेच काम त्यांनी केले आहे जर त्यांनी केलेल्या कार्याचा सकारात्मक पद्धतीने जगाने भारताने स्वीकार केला असता तर याच थायलंडने देखील भारताप्रमाणे वाहवा मिळविली असती पण त्यांनी त्यांच्या कलेचा उपयोग विकृतीकडे नेला आणि जगाला एका नव्या व्यसनाची ओळख झाली…
मसाज उर्फ मॉलिश हा प्रकार हा महागडा प्रकार या थायलंडने जगभरात हिंदुस्थानात नेला खरा, पण जगभरात विशेषतः मुंबईत किंवा अख्य्या हिंदुस्थानात या मसाज सेंटर च्या नावाखाली पोलिसांपासून सेफ आणि सुरक्षित असा फार मोठा वेश्या व्यवसाय सुरु झाला, अत्यंत महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या मसाज पार्लरचा मालक म्हणून एखादा एखादी डमी व्यक्ती विशेषतः स्त्री पुढे केल्या जाते पण खरे मालक समाजातले धनाढ्य प्रतिष्ठित व्यक्ती अनेकदा स्वतः पोलिसवाले किंवा अधिकारी किंवा पुढारी असतात हि वस्तुस्थिती आहे, काही वर्षांपूर्वी सात बंगला परिसरात मसाज पार्लर च्या नावाखाली सर्हास वेश्या व्यवसाय करणाऱ्या पार्लरवर जेव्हा पोलिसांनी धाड घातली नंतर कळले कि त्या पार्लरची मालकी एका आयपीएस अधिकाऱ्याची होती आणि राज्यातल्या बहुतेक मसाज पार्लरची कहाणी फारशी वेगळी नाही. केवळ योगासने पद्धतीने जर केवळ मसाज हा प्रकार देशात जगात रूढ झाला असता तर नक्कीच भारताप्रमाणे थायलंडला देखील मोठी प्रतिष्ठा मिळाली असती पण तसे अजिबात घडले नाही त्यामुळे आजही अख्खे जग तशी वस्तुस्थिती नसतांना देखील केवळ वेश्यागमन करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला देश म्हणून त्याकडे बघितले जाते किंबहुना थायलंडला जाणारे पुरुष इतर कोणत्याही देशाचे नाव सांगून तेथे जातात जसे वेश्यावस्तीतून एखादा पुरुष भलेही पुढे मंदिरात जात असेल पण त्याच्याकडे जसे कुत्सित नजरेने संशयाने बघितले जाते नेमके तेच थायलंडला जाताना घडते. आपल्या या मुंबईत पुण्यात नागपूरात महाराष्ट्रात जागोजागी जे मसाज पार्लर्स उघडलेले आहेत त्यातले फारतर 20 टक्के पार्लर मध्ये केवळ मसाज केली जाते अन्यत्र मात्र प्रतिष्ठित असा हा छुपा वेश्या व्यवसाय केला जातो हीच वस्तुस्थिती आहे, मोठे हप्ते मिळण्याचे पार्लर्स हे आता फार मोठे साधन उपलब्ध झाले आहे जी थायलंडची देणगी आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी
52 Total Likes and Views