सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पार ४० च्या वर गेला आहे. उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच टरबूज, काकडी यांसारखी फळे खावीत. ताक, लिंबूपाणी, वेगवेगळ्या फळांचे रस प्या. तुम्ही नारळाच्या पाण्याचाही समावेश करायला हवा. नारळाचे पाणी आपल्या शरीराला हायड्रेट करतोच, पण त्याचबरोबर अनेक आजारही लांब ठेवतो. तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर नारळपाणी खूपच उपयुक्त सिद्ध होऊ शकते. नारळपाणीमध्ये केवळ एक पदार्थ मिसळून प्यायल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे जाणवू शकतात. उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी एक ग्लास नारळपाण्यात अर्धा चमचा सब्जा बी म्हणजे तुळशीच्या बिया मिसळून प्याव्या. सब्जा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळेल. अनेकांना सब्जा बीची चव आवडत नाही. पण चव काय पाहता? त्या बियांचे गुण पहा. तुळशीच्या बिया तशा वेगळ्याही घेता येतील. एक चमचा बिया रात्री भिजत टाका. सकाळी पिऊन टाका.
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असून ते कमी कॅलरी असलेले पेयदेखील आहे. यासोबतच त्यात अँटिऑक्सिडंट्स, एमिनो-अॅसिड, एन्झाइम्स, बी-कॉम्प्लेक्स सारखे घटकही आढळतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. नारळाचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. इतकेच नाही, तर ते रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करते. तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या बियांमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, कार्ब आणि फायबर भरपूर असतात. याबरोबरच त्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यांसारखे पोषक घटकही भरपूर असतात. याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. यामध्ये आढळणारे फायबर वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय सब्जाच्या बिया बद्धकोष्ठता, अशक्तपणा दूर करण्याबरोबरच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
336 Total Likes and Views