पवारांचा अजितदादांकरवी कार्यकर्त्यांना निरोप
मुंबई :- आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तसे न केल्यास आपणही राजीनामा देण्याचा निर्धार सगळ्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेतेमंडळींनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांचा निरोप घेऊन हे सर्व नेते वाय. बी. चव्हाण सेंटर येथे परत आले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना सांगितला.
माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. गप्प बसा. आज ११ वाजता आपला जो कार्यक्रम होता त्यासाठी सर्व कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमावेळी शरद पवार अशी घोषणा करतील असे कुणालाही वाटले नव्हते. आम्हा नेत्यांनाही याची कल्पना नव्हती. पवार साहेबांचा निर्णय आपल्या सगळ्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निर्णयाविरोधात तुम्ही ठिय्या मांडला. तो तुमचा अधिकार आहे. शरद पवार यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यांनतर शरद पवार सिल्व्हर ओकला (Silver Oak) गेले, असे अजित पवार यांना कार्यकर्त्यांना सांगितले.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या निर्णयानंतर एकीकडे पक्षाचे ९ बडे नेते, तर दुसरीकडे अजितदादा एकटे
शरद पवार यांच्यानंतर आम्ही सिल्व्हर ओकला गेलो. सर्वांची इच्छा आहे. मी निरोप दिलेला. त्यांनी मला रोहित पवार, भुजबळ यांना सांगितलं की, माझा निरोप द्या. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला दोन ते तीन दिवस विचार करायला लागतील. आपले दैवतच म्हणत असेल की दोन ते तीन दिवस द्या. तर ते आपल्याला मान्य करावे लागेल. मात्र, ते म्हणाले की, मी विचार तेव्हाच करेन सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी जातील. जे पदाधिकारी राजीनामा देत आहेत त्यांनी मागे घ्यावा. तरंच मी निर्णय घेईन, असा निरोप शरद पवार यांनी द्यायला सांगितला, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
इथे कुणी बसलेले दिसायला नको. त्यांनाही देशातून राज्यातून फोन येत आहेत. ते म्हणाले की मला दोन-तीन दिवस लागतील. मी तुमचे भावनिक बोललेले ऐकले आहे. अनेकांनी आपापली भूमिका मांडली. या गोष्टी त्यांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. सुप्रिया सुळेला बाजूला घेऊनही बोलले, असे अजित पवार यांनी सांगितले.
पवार साहेबांनी परिवारातील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनी हट्टीपणा सोडावा. ते म्हटले, तुम्ही हट्टी आहेत ना मग तुम्ही माझेच कार्यकर्ते आहात. मी डबल हट्टी आहे. राजीनामा मागे घेणारच नाहीत, असे अजित पवार यावेळी सांगितले.
78 Total Likes and Views