मोबाईलची स्क्रीन टॉयलेटपेक्षाही घाण असते

Analysis
Spread the love

उडालात ना. पण हे खरे आहे. ज्या पद्धतीने आपण मोबाईलचा वापर करतो, तो चुकीचा आहे. २४ तास सोबत ठेवतो. कुठेही नेतो आणि कसाही वापरतो. कानाला लावून बोलतो. गालाला लावून बोलतो. त्यामुळे मोबाईलवर विषाणू पकडतात. सारेच विषाणू नुकसानकारक नसतात. पण काही असू शकतात. त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. तज्ञांचे म्हणणे आहे की, व्हिडीओ मोबाईल फोन हा नेहमी चांगल्या-वाईट बॅक्टेरीयाने घेरलेला असतो. एवढंच काय आपल्या
मोबाईलची स्क्रीन पब्लिक टॉयलेटपेक्षाही घाण असते.
भारतीय माणसे तशीही स्वच्छतेबद्दल फारसे गंभीर नसतात. मात्र हे मोबाईल प्रकरण गंभीरपणे घ्यावे लागेल. कारण हल्ली मोबाईलचा वापर वाढला आहे. माणूस सारखा मोबाईलशी चाळा करीत असतो. तासभरही मोबाईल पाहिला नाही तर अस्वस्थ होणारी माणसे आपण पाहतो. अनेक लोक टोयलेटला जातानाही सोबत मोबाईल नेतात. आता बोला. मोबाईल वापरा. पण स्वच्छता ठेवा. हात स्वच्छ राहतील याची काळजी घ्या. खोकला असेल तर खोकल्याचे जंतू मोबाईलवर जमतील. फोनवर बोलत असताना चेहऱ्याला होणारा स्पर्श आणि यामुळे त्वचेवर बॅक्टेरियाचा परिणाम होतो. यामुळे पिंपल्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
फोन सतत स्वच्छ ठेवावा. ओलसर स्वच्छ कपड्याने पुसावा. मोबाईल तुमच्या सोयीसाठी आहे. मोबाईलसाठी तुम्ही नाही हे लक्षात ठेवा. अनेकांना मोबाईल उशीखाली ठेवून झोपायची सवय असते. ती भयंकर आहे. मोबाईलमधून रेडीऐशन सुरु असते. त्याचा त्रास होऊ शकतो. मोबाईलवर तास तासभर बोलायचे अनेकांना सवय असते. तसे करू नका. कामापुरते बोला. कानाला फार चिटकवून बोलू नका. शेवटी मोबाईल हे यंत्र आहे. ते आजारी पडले तर बंद पडेल. आपण आजारी पडण्याचा धोका का पत्करायचा?

 1,001 Total Likes and Views

0 Comments

No Comment.