आपली मुलगी बाहेर काय करते?

Analysis
Spread the love

हल्लीचे जग वेगवान झाले आहे. रोजच्या जगण्याच्या ह्या संघर्षात घर हरवले, घराचे घरपण हरवले, माया हरवली, आई-वडील हरवले. मुलापासून मोठ्यापर्यंत मुलं-मुली मोठी होत आहेत. पण त्यांना माया लावायला न घरात आजीआजोबा आहेत न मामा, आत्या. जंगली झाड वाढावे तशी आजची तरुण पिढी वाढते आहे. त्यातून भलत्याच प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते याच्याशी आजच्या आईवडिलांना काहीही घेणे देणे नाही असेच दिसते. भरल्या घरात मुलं एकटी पडली आहेत. त्यातून ती बाहेर जिव्हाळा शोधत आहेत. त्या धडपडीत ती भलत्याच संकटात सापडत आहेत.
नागपुरात नुकतीच उजेडात आलेली एक घटना तमाम मायलेकांना शुद्धीवर आणेल काय? नागपुरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरात कुणी नसताना तिने सिलिंग फॅनला दोरी बांधून आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या आत्महत्येचं नेमकं कारण सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. मृत विद्यार्थिनी ही नागपूरमधील एका नामांकित महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तर तिचे वडील केंद्र सरकारमध्ये नोकरीला होते. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, ती लेस्बियन (समलैंगिक) असल्याचं नमूद केलं आहे. एका मुलाबरोबर लग्न करून सुखी जीवन जगणं तिला शक्य नसल्याचंही तिने म्हटलं आहे. मनाविरुद्ध जगण्यापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल, असं तिने लिहिले आहे.
अशाप्रकारे एखाद्या समलैंगिक तरुणीने आत्महत्या केल्याची ही नागपूर शहरातील वर्षभरातील दुसरी घटना आहे. मार्चमध्ये, एका तृतीयपंथी व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला मुलाशी लग्न करण्यापासून रोखल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केली होती.

    हल्लीच्या पिढीच्या समस्या काय? आणि त्यांना कसे सामोरे जायचे ह्याचा  जुन्या पिढीला गंध नाही. त्यातून ह्या अशा  संवेदनशील मुली जीवाचे बरे वाईट करून घेतात.  पोलिसांनी सांगितले, की सांगितलं की, आपण समलैंगिक (लेस्बियन) असल्याचं कळल्यानंतर पीडित मुलीने याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. पण आई-वडिलांनी तिला पाठिंबा दिला नाही. तसेच तिने मुलाबरोबर लग्न करावं, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. यामुळे पीडित तरुणी नैराश्यात गेली. यातूनच तिने रविवारी घरात कुणी नसताना सिलिंग फॅनला दोरी बांधून आत्महत्या केली. आज हे एका घरात घडले. उद्या तुमच्या घरातही घडू शकते. तेव्हा वेळीच सावध व्हा. मुलांवर –मुलींवर  योग्य विचारांचे संस्कार करा. त्यांना चांगली संगत मिळेल ह्यासाठी  पुढाकार घ्या. आहे कोणाला वेळ?

 1,066 Total Likes and Views

0 Comments

No Comment.