माधुरी ५६ वर्षांची झाली

Uncategorized
Spread the love

‘धक धक गर्ल’ बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित पाहता पाहता ५६ वर्षांची झाली. हेवा वाटावा असे तिचे बॉलीवूडमधले करिअर आहे. १९८४ मध्ये तिने सिनेमा जगात एन्ट्री मारली. तब्बल ७० चित्रपट केले. ‘तेजाब’, ‘दिल’ आणि ‘बेटा’सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज वयोमानाप्रमाणे ती लीड रोलमध्ये नसली तरी सक्रीय आहे. आणि म्हणूनच १५ मे हा तिचा वाढदिवस तेव्हा तिला खूप फोन आले.
माधुरीने नाव कमावले, कीर्ती मिळवली तसे पैसेही बनवले. २६४ कोटी रुपये संपत्तीची ती मालकीण आहे. ती एका चित्रपटासाठी सुमारे ५ कोटी रुपये घेते होती अशी माहिती आहे.
माधुरी ब्रँड प्रमोशनमधून देखील भरपूर कमाई करते. इतकंच नाही तर ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत ती दिसते.
एका रिअॅलिटी शोला जज करण्यासाठी ती एका सीझनसाठी २५ कोटी रुपये घेते. यासोबतच ती अनेक ब्रँड्सना एंडोर्स करते. माधुरी एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सुमारे ८ कोटी रुपये घेते.
माधुरी दीक्षितची ‘डान्स विथ माधुरी’ नावाची ऑनलाइन डान्स अकादमी आहे. यातून तिला भरपूर पैसे मिळतात. याशिवाय माधुरी आरएनएम मूव्हिंग पिक्चर्सची सह-संस्थापक देखील आहे. तिचे पती श्रीराम नेने यांच्यासोबत तिने ही कंपनी सुरू केली. माधुरीने एका स्टार्ट-अप कंपनीतही गुंतवणूक केली आहे. ती फिटनेस तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते.
माधुरीला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. तिच्याकडे व्हाइट ऑडी, टोयोटा इनोवा क्रिस्टल, रोल्स रॉयस आणि स्कोडा रैपिड अशी अनेक वाहने आहेत. १९९९ मध्ये तिने लग्न केले. दोन मुलं आहेत. सकारात्मकता बाळगून आयुष्याचा आनंद घेणारी माधुरी मराठी आहे. खास म्हणजे ह्या वयातही तिचा फिटनेस तरुणांना लाजवणारा आहे.

 163 Total Likes and Views

0 Comments

No Comment.