खालील लेख हा वेंगुर्ले येथील वेदभुषण श्री भूषण दिगंबर जोशी यांनी लिहीलेला आहे. लिहण्यात प्रामाणिकपणा दिसला, तळमळ दिसली, अनुभव दिसला व मुख्य म्हणजे मला त्यांची मतं शंभर टक्के पटली म्हणून जसा आहे तसा लेख पुढे पाठवत आहे. तुमची मत जाणून घ्यायला आवडेल.
विशेष सुचना – हा लेख कोणासहि दुखावण्याकरता लिहिलेला नाही तेव्हा राग मानु नये.
सर्व वेदवेत्त्या गुरुजनांना वंदन करुन अेका विषयास स्पर्श करत आहे.
हिंदुस्थानात सांप्रत गाजत असलेल्या मंदिर प्रवेश व मंदिरांच्या अनुषंगीक वाद (गर्भगृहात प्रवेश किंवा व्यवस्थापनात नियुक्ती वगैरे) या वर विविध माध्यमांतुन दोन्ही बाजूने चर्चा झडत आहेत. न्यायालयाचे काही निकाल हि या विषयात आलेत आपण हे सर्व जाणत आहात.
हिंदुंच्याच मंदिरांमध्ये हि स्थिती येण्यामागची काही कारणे आहेत ज्याला आपणच सर्व हिंदु बांधव उत्तरदायी आहोत अन्य कोणी याकरता जबाबदार नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे.
(मी स्वत: पौरोहीत्य करतो, व्याख्याने प्रवचने या निमित्ताने अनेक ठिकाणी जाणे होते) माझ्या अल्पज्ञानाने हि कारण मीमांसा मांडतो आहे.
*कारण क्र.१*
मंदिरांमध्ये भक्त म्हणून जायला हवे आम्हि पर्यटक म्हणून जातो. अनेक मंदिरे पर्यटन स्थऴ म्हणून जाहिर झालेली आहेत. हे पर्यटक मंदिरात बसुन भगवंताचे ध्यान नामस्मरण करण्यापेक्षा “सेल्फी ” काढण्यात मग्न असतात त्यांना त्या मंदिरातल्या देवाबद्दल किंवा संतांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल जाणुन घेण्यात रस नसतो. ते ऑफीसच्या आजुबाजुच्या गप्पा मारत बसलेले असतात.
प्राचीन मंदिरांच्या स्थापत्यशास्त्राबद्दल तिथे माहिती दिली जात नाहि. (ज्यात भारतीय स्थापत्य शास्त्राचे उत्तुंग कार्य पाहता येते) या उलट अनेक “कार्यसम्राट नेत्यांची “जाहिरात, उत्सवांच्या शुभेच्छा यांचे फलक भावी आमदार, गल्लीतले नेते यांचे मोठ मोठे होर्डिंग्स मंदिरांच्या चहुकडे पाहता येतात.
मंदिराच्या आजुबाजुस विद्रुपीकरण सुरु असते.मंदिरात बसुन नामस्मरण करणे दूर हे टुरीस्ट पुढच्या प्रवासाचे प्लँनींग करण्यात मग्न असतात.
*कारण क्र २*
मंदिरांच्या जवऴ पूर्वी धर्मशाळा असायच्या ज्याला तीन भिंती व छत असायचे ज्यात पांथस्थ मंडऴी किंवा भक्तमंडऴींना उपासनेकरता राहण्याची सोय असायची. भक्त या ठिकाणी आनंदाने राहायचे आठ दिवस पारायणे सप्ताह करायचे व भगवंतांची सेवा करायचे.
या भक्त निवासांचे आता लॉजींग झाले आहे. टुरीस्ट विचारतात ए.सी रुम आहे? डबल बेड आहे का? रुम मधे टिव्हि आहे का? (भक्ताला यापैकी कसलीही लक्झरी सोय नसली तरी चालते)
अनेक तरुण मंडऴी “हनीमुन”करता देखील भक्त निवासाचा वापर करतात.
अनेक ठिकाणी भक्तनिवासांत तरुण तरुणींनी “आत्महत्या ” केल्या आहेत. (हे पतीपत्नी नव्हते तर घरातून पऴून आलेले किंवा प्रियकर प्रेयसी होते)
भक्तनिवास हा भक्तांकरता व उपासनेकरता आहे तो अनैतिक कामांसाठि दुर्दैवाने हिंदुच वापरतात हे दुसरे कारण
*कारण क्र.३*
मंदिराच्या आजूबाजूस पान गुटखा सिगरेट वगैरे व्यसनांची दुकाने दुर्दैवाने हिंदुंचीच आहेत.
*कारण क्र.४*
काहि मंदिरात तर कर्मचारी व्यवस्थापन विश्वस्त यांनाच भगवंताविषयक आस्था नसते. अनेक मंडऴींना त्या देवतेचे किंवा संतांचे कार्यच नीट माहित नसते. त्या देवतेवर किंवा संतांवर लिहिलेली ग्रंथसंपदा अभंग रचना पुराणे अथवा संतवाङमय या बद्दल अनेक ठिकाणी अनास्था दिसते.
सर्व संतांनी वेदांत तत्वज्ञान सुलभ सोपे मराठीत अभंग किंवा ओवीबध्द केले मंदिरात या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हायला हवा तो म्हणावा तसा होत नाहि त्यामुऴे मंदिर हे आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र होत नाहि . त्यामुऴे कोणीहि उपटसूंभ हिंदुंच्या देवतांच्या कथांवर टिका करतो.
*कारण क्र.४*
मंदिर व्यवस्थापनात राजकारणी किंवा आर्थिक सधनता पाहून किंवा त्या प्रांतातल्या “वजन दार ” माणसाची वर्णी लावली जाते तो व्यक्ती भक्त नसला किंवा सदाचरणी नसला तरी देखील हि नियुक्ती केला जाते.
(उत्तम साधक उपासक निष्काम भक्त व सदाचारी व्यक्ती मग तो कोणत्याहि जातीधर्माचा असेना तो या पदावर नियुक्त झाला पाहिजे)
*कारण क्र. ५*
हिंदुंची उपासनाच कमी पडु लागलीय.
शक्ती व भक्ती या दोघात आपण कमी पडतोय. सायंकाऴी शुभंकरोती ऐवजी सिरीयल चे स्वर कानी पडतात. ज्या वेऴी लक्ष्मी घरात येते त्यावेऴी सिरीयल मधली कटकारस्थाने, दोन बायकांच्या भानगडि, फसवणूक, एकमेकांवर अविश्वास हेच मोठमोठ्याने कानी पडत मग आपसुकच काकी मावशी आत्या या कारस्थानीच असतात हा समज मनात घर करु लागतो. प्रत्येक सदस्य एकमेकांकडे संशयानेच पाहतो. हे नकऴत घडु लागते या संशय ग्रस्त पिशाच्चांना मग “शांतीदूत ” रविवारी हुलुहुलु करुन समुह संमोहित करतात (मॉब हिप्नोटाईझ) व यांना धर्मांतरीत करतात. देवतांची विटंबना सर्वात जास्त हे सिरीयल वालेच करतात. त्यात कृष्ण, यम, व नारद हे यांचे फेव्हरेट. (हे कधी येशु, अल्ला यांची चेष्टा करतात का ? यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिंदुंसाठिच ) आम्हाला या बद्दल कधीच खेद होत नाहि हेच आमचे दुर्दैव.
आमच्या हिंदुंच्या देवस्थानांमध्ये कोणीहि उपटसूंभ येतो काहिहि गोंधऴ घालतो, तरी आम्हास काही फरक पडत नाहि .
राम मंदिर बांधावे का? हा प्रश्नच मुऴात “हिंदुस्थानात “निरर्थक आहे.जो देशच रामाचा आहे तेथे परवानगी कशाला हवी ? बाबराने परवानगी घेवुन मशीद बांधली होती का ?
आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या बलाची उपासना व उपासनेचे बल या दोन्हि गोष्टि खंडित झाल्या आहेत या दोन्हि गोष्टि जेव्हा सुरु होतील त्या वृध्दिंगत होतील तेव्हाच हे शक्य होईल. नाहीतर हे दुर्दैवाचे दशावतार असेच सुरु राहिल यात वाद नाहि.
जाता जाता एकच सांगतो ज्या व्यक्ती आज अधर्माने वागताहेत व त्यांची पुढची अवस्था कशी असेल भगवंत त्यांना कशी शिक्षा देईल यावर फार सुंदर श्लोक मनुस्मृतीत दिलाय
अधर्मेणैधते तावत् ततो भद्राणि पश्यति ।
तत: सपत्नाञ्जयति समुलस्तु विनश्यति ।। (४.१७४)
मनुष्य अधर्माने प्रथम उन्नत्ती करतो मग तो आपले कल्याण झालेले पाहतो (संपत्ती सत्ता मान) मग तो आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करतो नातेवाईकांना हरवतो व शेवटि समुऴ नष्ट होतो.
(दूर्योधन हे याचे उत्तम उदारण आहे) अधर्माचे फऴ सुरुवातीस चांगलेच भासते पण शेवट फार भयंकर होतो.
तेव्हा आपल्या मंदिरांचा उत्कर्ष करायचा असेल तर स्वत:चे वर्तन प्रत्येकाने आपापले सुधारणे आवश्यक आहे. मंदिरात भक्त म्हणून जाणे आवश्यक आहे. पर्यटक म्हणून नाहि हे प्रत्येकाने स्वत:शी ठरवले पाहिजे.
आजपर्यंत भक्तासाठी भगवंत धावल्याची हजारो उदाहरणे आहेत टुरीस्ट साठी भगवंत धावल्याचे एकहि उदाहरण नाहि.
bg
*तुर्त लेखन मर्यादा*
*वे.भू. श्री भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले*
628 Total Likes and Views