नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे सत्तेच्या खुर्चीचे व्यापारी; फडणवीसांची टीका

Editorial
Spread the love

देशभरात सध्या संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधल्या गेलेल्या नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते केले जाणार आहे. यासंदर्भात विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे, अशी मागणी करत विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ते आज सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

संसद भवन हे देशातील १४० कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्यावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारणे आहे. विरोधक म्हणतात की, राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे परंतु जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेच्या उपभवनाचे उद्घाटन केले होते, तसेच राजीव गांधी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले होते, तेव्हा का नाही टाकला बहिष्कार. तेव्हा राष्ट्रपतींचा अपमान झाला नाही का? असा प्रश्न फडणवीसांनी विरोधकांना विचारला. तसेच त्यांनी यादी वाचून दाखवत विरोधकांना धारेवर धरले.

ही बातमी पण वाचा : ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या बैठकीला, लवकरच आमच्याकडे; शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट

१) इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं उद्घाटन केलं
२) तामिळनाडूमधील विधानसभेचं उद्घाटन सोनिया गांधी यांनी केलं
३) नितिश कुमार यांनी बिहारच्या सेंट्रल हॉलचं उद्घाटन केलं
४) युपीएचं सरकार असताना, मणिपूरच्या इन्फालमध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी तिथल्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का नाही केलं?
५) तरुण गोगोई यांनी 2014 साली आसामच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं
६) 2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं
७) 2018 मध्ये आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधान भवनाचं उद्घाटन केलं
८) 2020 मध्ये सोनिया गांधी यांनी छत्तीसगढच्या विधानभवनाचं भूमिपूजन केलं. त्या तर संवैधानिक पदावरही नव्हत्या. मग त्यांनी कसं काय उद्घाटन केलं. ही यादी वाचून दाखवत यावेळी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना का डावलले गेले याचे उत्तर विरोधकांनी द्यावे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

विरोधकांकडे ‘ना नेता आहे ना नीती’ आहे. त्यामुळे विरोधकांचे जे नरेंद्र मोदींना हरवण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. देशाने पहिल्यांदा स्वतंत्र भारताची स्वत:ची अशी संसद तयार केली आहे. या संसद भवनाची आसन क्षमता जास्त आहे. तसेच, आधुनिकतेने ती परिपूर्ण आहे. तर अशा संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार का? याचाच अर्थ असा की, हे सगळे लोक सत्तेच्या खुर्चीचे व्यापारी आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदींचा मुकाबला करु शकत नाहीत, म्हणून हे सगळे एकत्र आले आहेत. पण, माझा यांना सवाल आहे. मी इतकी उदाहरण दिली याचे आधी उत्तर द्या. यावेळी का बहिष्कार टाकला नाही, याचेही स्पष्टीकरण द्या. बहिष्कार टाकणारी मंडळी ही लोकशाही विरोधी लोक आहेत, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली आहे.

 98 Total Likes and Views

0 Comments

No Comment.