भाजपकडून मतविभाजनाचे प्रयत्न; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर पटोलेंचा आरोप

Analysis
Spread the love

काल अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवतीर्थ येथे जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिकेत(Mumbai Mahapalika) मनसे आणि भाजप एकत्रित निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा आत त्यांच्या भेटीनंतर होऊ लागल्या आहेत. दरम्यान, या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी टीका केली.

नाना पटोले म्हणाले, मत विभाजनाचे राजकारण भाजप करत आहे. मतविभाजन कसे होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि यापुढेही करत राहील. त्यामुळे त्यावर फार प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. नऊ वर्षाच्या जाहिराती पेपरला देतच आहेत, यासह नऊ वर्षात देशाच काय, काय विकले हे सांगायला हवे. जीएसटीमुळे सकाळी कोलगेटपासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांना टॅक्स भरावा लागतो. प्रत्येक ठिकाणी जीएसटी आहे, वीजेवर जीएसटी आहे. पंखा लावला तर त्यावरही जीएसटी आहे. सातत्याने तुमच्यावर टॅक्सचा बोजा बसवून आम्हीच विकास केलाय हा आव आणण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. त्यांनी वस्तुस्थिती आणायला पाहिजे होती. महागाईमुळे लोकांचे जीवन उध्वस्त झाले आहे, आताची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली असती तर आपण त्यांना विश्वगुरु म्हटले असते, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

माध्यमात फक्त महाविकास आघाडीच्या बातम्या समोर येत आहेत, भाजप आणि शिंदे गटात काही अलबेल आहे का? तीन पक्ष एकत्र आल्यानंतर होत राहतात या गोष्टी. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ. काँग्रेस समन्वयक आहे, देश वाचवणे ही आमची भूमिका आहे. सध्या देश महत्वाचा आहे, देशाचे संविधान धोक्यात आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणी सांगितल्या. नाना पटोले म्हणाले, आमचा तरुण मित्र हरपला, ही दुख:द घटना काँग्रेससाठी आहे. समाजाला न्याय देण्याच असलेले व्यक्तीमत्व आज आमच्यात नाहीत.

 736 Total Likes and Views

0 Comments

No Comment.