शिवसेनेचा वर्धापनदिन दोन ठिकाणी; शिंदे आणि ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शनची तयारी

Editorial
Spread the love

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन. दर वर्षी पक्षाचा वर्धापनदिन एकाच ठिकाणी साजरा केला जातो. मात्र मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार व १३ खासदारांनी उध्दव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. शिंदे गटानं भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. यासोबतच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्हही दिले आहे. त्यामुळे यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत.मात्र, आता पुन्हा शिंदे व ठाकरे गट शिवसेनेच्या वर्धापनादिनावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

शिवसेनेचा १९ जून रोजी वर्धापन दिन असतो. गेली सहा दशकं हा शिवसेनेकडून मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेकडून आमदार आणि पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शिवसेनेच्या इतिहासांत प्रथमच दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत. ठाकरे गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडणार असून, यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभाही होणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापनाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही

 102 Total Likes and Views

0 Comments

No Comment.