त्याने तिचे तुकडे केले, कुकरमध्ये शिजवले, पण अडकला

News
Spread the love

दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या घटनेला काही महिने उलटत नाहीत तोच मुंबईतल्या मीरा रोडमध्ये एक अत्यंत क्रूर  घटना उघडकीला आली आहे. मनोज साने नावाच्या एका नराधमाने  त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. एवढंच नाही तर हत्येनंतर त्याने लाकूड कापण्याच्या मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि तो अडकला.

              शेजाऱ्याला सानेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने संशय आला. त्याने  पोलिसांना कळवले. तिथे  जे दिसले ते पाहून पोलीसही हादरले. फ्लॅटमध्ये महिलेचे पाय पोलिसांना सापडले, त्यानंतर घरातल्या एका बादलीत आणि पातेल्यात  महिलेचं धड आणि शीर यांचे तुकडे होते. कुकरमध्ये ते शिजवून लपवण्यात आले होते. काही भाजलेले तुकडेही पोलिसांना मिळाले. वुड कटरच्या वापराने त्याने लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक केले. काही तुकडे कुकरमध्ये शिजवले. या सगळ्या तुकड्यांची तो एक एक करून विल्हेवाट लावत होता असे दिसते. कुत्र्यांना तो काहीतरी खाऊ घालताना अनेकांनी पाहिले. मात्र  कोणाला संशय आला नव्हता.

       सरस्वती आणि मनोज हे दहा वर्षांपासून एकत्र राहात होते. सरस्वती अनाथ होती. तिला कुणीही नातेवाईक नाहीत. तिचं शिक्षण १० वीपर्यंत झालं होतं. त्याने तिला का मारले ते तपासात समोर येईल. मात्र असे दिसते की,  ४ जूनपासून  तो सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कापत होता. खुनानंतरही आरोपी मनोज त्याच घरात राहात होता. किचनमध्ये तुकडे शिजवत होता आणि जेवायला बाहेर जात होता.

        मनोजच्या शेजाऱ्याने सांगितले की, मंगळवारी मी त्यांना बोलवायला गेलो. दार वाजवलं. पण काहीही प्रतिसाद आला नाही. मग मी थोडावेळ थांबलो तर मला रुम फ्रेशनरचा वास आला. रुम फ्रेशनरचा वास येऊ लागल्यावर मला थोडा संशय आला. सुरुवातीला दुर्गंधी यायची. आता  फ्रेशनर मारल्याचे  दिसले. इथेच मनोज साने अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सरस्वतीने आत्महत्या केल्याचे तो म्हणतो. मात्र पोलीस विश्वास ठेवणार नाहीत म्हणून मी तिचे तुकडे केले  असा त्याचा बचाव आहे. आपले तिच्याशी शाररीक संबंध नव्हते. कारण आपण एचआयव्ही पॉझीटीव्ह होतो असेही तो म्हणतो. मात्र  तपासात त्याने सरस्वतीशी   एक देवळात लग्न केल्याचे  समोर आले आहे. साने सध्या  पोलीस कोठडीत आहे.  उद्या तो खरे बोलून ताकेळी. पण सरस्वतीचा जीव थोडाच परत येणार  आहे? कलीयुगात  माणसे अधिकाधिक विकृत होत चालली आहेत एवढेच ह्यातून  समजायचे.  श्रद्धा, सरस्वती झाली. पुढे आणखी कोणी येईल. फक्त नाव बदलेल.  समाजाला ह्याच्याशी काही घेणेदेणे राहिले नाही.  शेजार मोडले. शेजारधर्म तर  केव्हाच संपला आहे.

 121 Total Likes and Views

0 Comments

No Comment.