काल महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच संबंधित जाहिरातीत ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’, असा उल्लेख करण्यात आला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर संबंधित जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात आले आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल वृत्तपत्रात जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये कुणीतरी खोडसाळपणा केला होता. आज शिंदे गटाने चांगल्या भावनेनं जाहिरात देऊन चूक दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : कोणाही मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही, निश्चिंत राहा; मुख्यमंत्री शिंदेंचे मंत्र्यांना आश्वासन
काल प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, काल वृत्तपत्रात जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये कुणीतरी खोडसाळपणा केला होता. शिंदे गटाची भावना वाईट असती तर त्यांनी आजची सुधारीत जाहिरात दिली नसती. मला वाटते की कुणीतरी खोडसाळपणा केला होता. तो खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न केला. हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. हे आमच्या युतीसाठी, पक्षासाठीही चांगले आहे.
युतीमध्ये कुणीतरी लहान व्हावे, कुणीतरी मोठे व्हावे. मला वाटते की, जेव्हा आपण युती करतो, तेव्हा एखादी चूक आमच्याकडून झाली असेल तर ती चूक आम्ही दुरुस्त केली पाहिजे. त्यांच्याकडून चूक झाली तर त्यांनी ती दुरुस्त केली पाहिजे. आता यामध्ये बोलण्यासारखे काही नाही. हा विषय आता संपला आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
68 Total Likes and Views