आदिपुरुष सिनेमा प्रभू रामाचा असेल असे वाटत असताना निर्मात्याने भलतेच उद्योग करून ठेवल्याचे दिसते. त्यामुळे लोक संतप्त आहेत. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. इतकच नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. ह्या सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. आता पोलिसांनीही मनोजला पूर्ण सुरक्षा दिली आहे.
सुरुवातीला निर्मात्यांनी सांगतिलं की, चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. मात्र प्रेक्षकांना त्यात रामायणाचा अंशच दिसला नाही. रामाणाच्या कथेशी आणि चाहत्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप प्रेक्षक निर्मात्यांवर करत आहे.
सोशल मीडियावरीलही नेटकरी चांगलेच भडकले असून आदिपुरुषच्या निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त करत आहे.
या चित्रपटात बालिश संवाद आणि अॅक्शन सीन आणि VFX वापरले आहेत. त्याचबरोबर रामायणाच्या कथेसोबत काहीतरी मॉडर्न करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. कलाकारांचे लुक विशेषत: रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आणि हनुमानाच्या भूमिकेतील देवदत्त नागे यांच्याबाबतही बराच वाद सुरू आहे.
चित्रपटातील संवादावर बराच वादही होत आहे. त्यानंतर आदिपुरुष केवळ रामायणातून प्रेरित असल्याचा दावा केल्यानंतर आता चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आणखी एक खळबळजनक दावा करून वाद निर्माण केला आहे. मनोज मुंतशीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते ‘हनुमान देव नसून भक्त होते’ असं म्हणताना दिसत आहे.
मनोज मुंतशीर यांनी नुकतीच एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. यात हनुमान देव नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मनोज मुंतशीर म्हणतात की, ‘बजरंगबली हे देव नव्हतेच, ते भक्त होते. आपण त्यांना देव बनवलं आहे.
चित्रपटातील आपल्या संवादांवर स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले की, हनुमान श्री रामसारखे तात्विक बोलत नव्हते.
आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून नेटकरींनी त्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. त्यांच्या मुलाखतीवर बंदी घालण्याची मागणी ते करत आहेत.
676 Total Likes and Views