टायटॅनिक पर्यटन, पाणबुडी बुडाली, ५ अब्जाधीशांनी गमावला जीव

Analysis
Spread the love

पाच  दिवसांपासून टायटन ही पाणबुडी चर्चेत आहे. ११२ वर्षापूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी या पाणबुडीतून पाच अब्जाधीश व्यक्ती समुद्राखाली गेले होते. ह्या साहसी सहलीसाठी त्यांनी प्रत्येकी दोन-दोन कोटी रुपये मोजले होते.  १८ जूनला सकाळी  त्यांची पाणबुडी  समुद्राच्या तळाकडे १३ हजार फुट खोल झेपावली. सायंकाळी ते परतणार होते. मात्र निसर्गाला ते मंजूर नव्हते.  त्यांची पाणबुडी  सकाळी  झेपावली. मात्र काही तासात   संपर्क तुटला. खळबळ उडाली.    शोध सुरु झाला.  पाणबुडी गायब झाल्यानंतर आता पाच दिवसांनी या सर्वांना आता मृत घोषित करण्यात आलं आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, या पाणबुडीच्या आतमध्ये स्फोट झाल्यामुळे ही फुटली. ज्यामुळे आतील सर्वांचा मृत्यू झाला.  पाणबुडीमध्ये असलेल्या यांत्रिक तुटीमुळे समुद्राच्या पाण्याचा संपूर्ण प्रचंड दबाव या पाणबुडीवर पडला असावा. त्यामुळे ही आतल्या दिशेने फुटली.

                  शोधमोहिमेवर गेलेल्या पथकाला टायटॅनिक जहाजाच्या जवळ बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत.  कॅनडाच्या एका जहाजावर असलेल्या रोबोटने ही बेपत्ता पाणबुडी शोधून काढली हे विशेष.

        १९१२ मध्ये अटलांटिक महासागरातील हिमनगाला धडकून बुडालेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजावरील दीड हजाराहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या जहाजाच्या अवशेषांचा शोध पहिल्यांदा १९८५ मध्ये लागल्यापासून त्याची पाहणी करण्यासाठी, अभ्यासासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. मात्र, आता त्या जहाजाचे अवशेषही  नष्ट होऊ लागले असून त्याआधी संशोधन पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. टायटनिकची जादू अशी की,  तिचे  सांगाडे  पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडतात. टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचणं, तिथे फिरणं आणि परत येणं या सगळ्या गोष्टींसाठी आठ तास लागतात. अनेक जन तिथपर्यंत जाऊन आले आहेत. ह्या वेळी मात्र घात झाला.

 584 Total Likes and Views

0 Comments

No Comment.